३० मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.
या दिवशी तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पुढील संदेश पाहू शकता.
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.
गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन सुरुवात करा, आनंदाने उजळून निघा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्ष नव्या संकल्पांचे, नव्या स्वप्नांचे, नव्या यशाचे असो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण अन् सुखाची बरसात, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
उभारुन आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय, होई जग सारे, नव-वर्षाची हीच तर, खरी सुरुवात, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!