Chhatrapati Shivaji Maharaj Historical Waghnakh In Satara:  Saamtv
Image Story

Shivray Waghnakh Satara: 'पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा'! छत्रपतींची ऐतिहासिक वाघनखं 'राजधानी साताऱ्यात', पाहा PHOTO

Gangappa Pujari
Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

वाघनखे साताऱ्यात

लंडनच्या व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यामध्ये आणण्यात आली आहेत.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

उद्घाटन सोहळा

आज या ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आले.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित

साताऱ्यातील संग्रहालयात पार पडलेल्या या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी नेते उपस्थित होते.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

राजधानी साताऱ्यात भव्य रॅली

या शाही सोहळ्यापूर्वी साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांच्या मुर्तीला अभिवादन करून भव्य-दिव्य रॅली काढण्यात आली.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

शिवमय सातारा

यावेळी छत्रपती शिवरायांच्या गगनभेदी गर्जना, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी अवघी राजधानी सातारा नगरी शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

कडक बंदोबस्त

उद्यापासून ही वाघनखे जनतेसाठी पाहण्यासाठी खुली होणार वाहेत. वाघनखांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सार त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

कशी पाहाल?

जिल्ह्यातील प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर इतर प्रेक्षकांना 10 रुपये प्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे.

Shivaji Maharaj Wagh Nakh Satara

वेळ!

सकाळी १० ते ५ या वेळेत हे संग्रहालय खुले राहणार असून वाघनखे पाहता येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT