देशातील ५० टक्केपेक्षा जास्त लोक आजही शेती करतात. यापैकी बरेच शेतकरी शेतीतून जास्त उत्पन्न मिळवू शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांना भारत सरकारकडून मदत दिली जाते.
२०१८ मध्ये भारत सरकारने पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत केली जाते. यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण कराव्या लागतात.
या किसान योजनेत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट पैसे पाठवले जातात. ज्या शेतकऱ्यांनी यासाठी आवश्यक नोंदणी केली आहे ते योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. परंतु लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची माहिती आणि कागदपत्रे अपडेटेड ठेवावी लागतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि त्यामुळेच त्यांना पैसे मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.
जर तुम्ही हे काम अजूनही केले नसेल तर त्वरित तुमच्य जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करा. याशिवाय, तुम्ही ऑनलाईन पेर्टलवर जाऊन देखील हे काम करु शकता.
शेतकऱ्यांनी हे काम वेळेवर केले नाही तर त्यांना योजनेतून वगळता येईल. म्हणून, पुढील हप्ता तुमच्या खात्यात वेळेवर जमा होण्यासाठी त्वरित तुमची शेतकरी नोंदणी पूर्ण करा आणि कागदपत्रे अपडेट करा.