झोपेत लाळ गळणे ही समस्या जितकी सामान्य वाटते तितकी मुळातच ती नसते.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तींची झोपेत लाळ गळते त्यांचा एक ग्रह कमजोर मानला जातो.
ज्या व्यक्तींच्या कुंडलीमधील एखादा ग्रह कमी असतो त्यांनी झोपेत लाळ गळण्याच्या समस्या उद्भवत असतात.
ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील सुर्याची स्थिती कमजोर असते. अशा व्यक्तींना काही संकेत मिळतात. त्यापैकी लाळ गळणे हा एक संकेत आहे.
हिंदू धर्मात सुर्यला आत्मा आणि सर्व ग्रहांचा कारक मानला जातो. झोपताना तोंड उघडे ठेवणे हा सुद्धा एक संकेत आहे.
सुर्य हा तुळ राशीमध्ये जर ६, ८, १२ व्या घरात असतो किंवा एखाद्या अशुभ ग्रहाने ग्रस्त असतो तेव्हा तो कुंडलीत कमकुवत असतो.
जर कुंडलीत सुर्य कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधिक अनेक समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्हाला सूर्याला बळकट करायचे असेल तर त्याला जल अर्पण करा.
तुम्ही सूर्याला जल अर्पण करताना 'ॐ सूर्याय नमः' असा मंत्र म्हणून ही समस्या दूर करु शकता.