Breast Cancer saam tv
Image Story

Breast Cancer: रात्री ब्रा घालून झोपल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो?

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वात सामान्य कॅन्सर आहे. स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता नसल्याने बहुतेक महिला या कर्करोगाला बळी पडतायत.

Surabhi Jayashree Jagdish

महिला स्तनाच्या कॅन्सरबाबत अनेक गैरसमजुतींवर विश्वास ठेवतात. यामधील एक म्हणजे रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. ही गोष्ट बऱ्याच महिला मानतात. ब्रा घालून झोपल्याने खरोखरच स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का ते जाणून घेऊया.

ब्रेस्ट हेल्थ एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या मते, ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होतो ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे.

ब्रा आणि स्तनाच्या कर्करोगाचा काहीही संबंध नाही. स्तनाच्या कर्करोगाची इतर कारणं असू शकतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ब्रा घालून झोपल्याने स्तनाचा कॅन्सर होत नाही.

रात्री ब्रा घातल्याने कॅन्सर होत नाही. मात्र त्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.

रात्रभर घट्ट ब्रा घालून झोपल्याने रक्त प्रवाहात समस्या येऊ शकतात. ज्यामुळे वेदना किंवा जळजळ होऊ शकते.

ब्रेस्ट कॅन्सरचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनात गाठ असणं. याशिवाय स्तनाच्या आकारात बदल होणं हे देखील कॅन्सरचं एक लक्षण असू शकते.

स्तनाचा रंग बदलणं हे देखील कॅन्सरचं लक्षण मानलं जातं. स्तनाची त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसणं हे देखील लक्षण असू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: मुलीला शिकवतात म्हणून गावकरी हसले, पण मोठ्या जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक; IAS सुलोचना मीना यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा, वाहतूकीत महत्त्वाचे बदल

Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

Puranpoli: होळीला नैवेद्य करताना पुरणपोळी नेहमी फुटते? मग वापरा ही आजीने सांगितलेली टिप, वाचा ही सिक्रेट टिप

Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

SCROLL FOR NEXT