Beed Accident | Car And Jeep Collide Head-on Near Neknoor, Engine Flies 100 Feet 
Image Story

बीडमध्ये कार आणि जीपची समोरासमोर धडक; इंजिन 100 फूट लांब उडून पेट्रोल पंपाजवळ पडलं; Photos

Beed Accident: बीड तालुक्यातील नेकनूरजवळ बीड-अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Bharat Jadhav

बीड-अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपचा भीषण अपघात झाला. बीड तालुक्यातील नेकनूरजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

कारचे इंजिन उडून तब्बल १०० फूट अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन पडलं. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

या भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, बीडकडे येत असलेले आयपीएस अधिकारी वेंकटराम आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली.

बीड तालुक्यातील नेकनूरजवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर धडक झाली.

कारचे इंजिन वाहनातून बाहेर फेकले जाऊन सुमारे १०० फूट अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या परिसरात जाऊन पडले.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गुळुंचे येथे हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार..

कापसाच्या पिकात गांजाची शेती! नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्षभराची मेहनत मातीमोल! कधी काळी बागायती शेती, आता उजाड माळरान; दुष्काळाने सांगवी गावाची दैना

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पती-पत्नीला मिळणार दरमहा 6,000 रुपये पेन्शन; असा करा अर्ज

रात्री वारंवार लघवीला जावं लागतंय, काही गंभीर आजाराचे संकेत तर नाहीत ना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT