Shani Gochar And Surya Grahan saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 12 महिन्यांनी चंद्राच्या राशीत शुक्राचं गोचर; 3 राशी होणार मालामाल, करियरमध्येही मिळणार उंची

Venus Planet Transit In Cancer: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह गोचर हे मानवी जीवनावर मोठे परिणाम करतात. ढील १२ महिन्यांच्या कालावधीत शुक्र वेगवेगळ्या चंद्र राशींमध्ये गोचर करत असताना, काही विशिष्ट राशींना धनलाभ आणि करिअरमध्ये उंची मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. नवग्रहांमध्ये सर्व ग्रहांना महत्त्व देण्यात आलं असून शुक्र ग्रहाला देखील खास महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विलास, वैभव, संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख यांचं कारक मानण्यात येतं. यावेळी सुमारे १ वर्षानंतर शुक्र त्याच्या राशीत बदल करतो.

जुलै महिन्यात शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आह. मात्र ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे गोचर शुभ ठरू शकणार आहे. या दिवसांत त्यांच्यासाठी नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

तूळ रास

शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात वडिलांसोबतच्या नात्यात गोडवा येणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर सकारात्मक ठरू शकणार आहे. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकणार आहेत. यावेळी तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थितीत बळकट होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

मकर रास

शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. शुक्र तुमच्या राशीतून सातव्या घरात गोचर करणार आहे. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकणार आहेत. विवाहित लोकांचं जीवन चांगलं राहणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT