Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog: १२ महिन्यांनंतर शुक्र बनवणार पॉवरफुल योग; कमाईसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

Malavya Rajyog 2025: ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोगांची निर्मिती होणार आहे. यावेळी शुक्राच्या गोचरमुळे खास राजयोगाची निर्मिती होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळात त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोगांची निर्मिती होते. जूनमध्ये शुक्र ग्रह स्वतःच्या राशी वृषभमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. या राजयोगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. याशिवाय संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात काहींना बिझनेसमध्ये चांगला परिणाम मिळू शकतो. तुम्ही परदेशात प्रवास करू शकता.

सिंह रास

मालव्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. तुम्ही तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती करू शकणार आहात. गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर फायदा होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.

मेष रास

मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. गोचर कुंडलीत शुक्र ग्रह धन आणि वाणीच्या स्थानावर भ्रमण करणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची संधी मिळणार आहे. कला आणि संगीताशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात.

कुंभ रास

मालव्य राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा राजयोग तुमच्या राशीच्या मालमत्तेच्या घरात तयार होणार आहे. महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सासू आणि सासू-सासऱ्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Bigg Boss 19: 'आम्हा दोघांना चंद्र...'; बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने दिली प्रेमाची कबूली; म्हणाली...

Crime: भयंकर! शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; भिवंडी हादरले

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट केला नाही, तो दहशतवादी नाही, ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mahima Chaudhary Wedding: 52 व्या वर्षी बोहल्यावर चढणार महिमा चौधरी? कोण आहे तिचा नवरा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT