Trigrahi Yog saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: एकाचवेळी तयार झाले 2-2 त्रिग्रही योग; 'या' राशींना श्रीमंत होण्यापासून रोखणं कठीण, पैशांचा होणार पाऊस

Double Trigrahi Yog: ज्योतिषांच्या मते शनी ग्रह आधीच कुंभ राशीत होता. यामुळे कुंभ राशीत बुध, सूर्य आणि शनी यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होतोय. एकाच वेळी दोन राशींमध्ये दोन त्रिग्रही योगांची निर्मिती होणे ही एक दुर्मिळ ज्योतिषीय घटना मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. बुध ग्रहाने मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. तर सूर्यानेही १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुंभ राशीत गोचर केलंय. ज्योतिषांच्या मते शनी ग्रह आधीच कुंभ राशीत होता. यामुळे कुंभ राशीत बुध, सूर्य आणि शनी यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होतोय.

कुंभ राशीत या त्रिग्रही योगासोबतच मीन राशीत तीन ग्रहांची युती देखील आहे. मीन राशीत तयार होणाऱ्या त्रिग्रही योगात शुक्र, राहू आणि नेपच्यूनची युती असते. एकाच वेळी दोन राशींमध्ये दोन त्रिग्रही योगांची निर्मिती होणे ही एक दुर्मिळ ज्योतिषीय घटना मानली जाते.

डबल त्रिग्रही योगांचा राशींवर होणार परिणाम

ज्योतिषांच्या मते, या द्विग्रही योगाचा सर्व राशींवर व्यापक आणि खोल प्रभाव पडणार आहे. या त्रिग्रही योगांचा काही राशींसाठी खूप सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांना श्रीमंत होण्यापासून रोखणं कठीण आहे. पैशाच्या वाढत्या प्रवाहामुळे त्यांची अनेक अपूर्ण स्वप्ने सत्यात उतरू शकतात. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग उत्पन्न आणि नवीन संधींसाठी शुभ असणार आहे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आदर वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी आदर मिळणार आहे. जुन्या मालमत्तेशी संबंधित नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती राहील. या योगांच्या प्रभावाने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवाल आणि भरपूर पैसे कमवाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chavalichi Usal Recipe: झणझणीत चवळीची उसळ सोप्या पद्धतीनं कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: तीन दिवस ठाणे शहरात ३० टक्के पाणी कपात

Loan Interest Rate: होम लोन झालं स्वस्त! या ५ बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाण अन् निलेश राणे यांची गळाभेट, महायुतीत नेमकं चाललंय काय? VIDEO चर्चेत

Actor Dileep: बलात्कार प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याची निर्दोष सुटका; २०१७ मध्ये अभिनेत्रीने केले होते गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT