Siddhi Hande
फणसाचे गरे सर्वांनाच आवडतात. परंतु कोवळ्या फणसाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का?
कोकणातील कोवळ्या फणसाची भाजी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही घरी जेवताना ही भाजी बनवू शकतात.
कोवळा चिरलेला फणस, लसूण, बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, गरम मसाला, कोकणी मसाला, शेंगदाण्याचा कूट, तेल, हळद, मोहरी
सर्वात आधी तुम्हाला फणस सोलून त्याचे वरचे कव्हर फेकून द्यायचे आहेत. त्यानंतर आतल्या फणसाचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे.
यानंतर एका टोपात पाणी गरम करायचे आहे. त्यात थोड मीठ टाका आणि फणस वाफवून घ्यायचे आहेत.
यानंतर कढईत तेल गरम करायचे आहेत. त्यात मोहरी, लसूण, कांदा आणि लसूण परतून घ्या.
यानंतर हळद आणि मसाला नीट मिक्स करा. यामध्ये फणस मिसळा.
यावरुन शेंगदाण्यचा कूट आणि मीठ टाकून ५-७ मिनिटे वाफवून घ्या. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात.