lakshmi Mata Worship  saam Tv
राशिभविष्य

Lakshmi Mata: तुमच्या संपत्तीत वाढ करेल तुळशी, दूध आणि कमळाच्या फुलांचा तोडगा; जाणून लक्ष्मी प्राप्तीचे ५ उपाय

lakshmi Mata Worship : आजच्या रविवारच्या स्पेशल लेखात लक्ष्मी प्राप्तीचे पाच उपाय आणि तोडगे जाणून घेणार आहोत.

Anjali Potdar

प्रत्येक व्यक्तीच्या मनात धन मिळवण्याची अशी इच्छा असते. पैश्यांशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मी मातेच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मी मातेच्या पूजा केल्यानं आपल्याला पैशांची प्राप्ती होतीच शिवाय आपल्या वैभवात देखील वाढ होत असते. रविवारीच्या तुम्ही घरी काही उपाय केले तर धनाची प्राप्ती लवकर होते. तसेच त्यात वाढ होत असते.

आजच्या रविवारच्या स्पेशल लेखात लक्ष्मी प्राप्तीचे पाच उपाय आणि तोडगे जाणून घेणार आहोत. जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी हे उपाय करून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करावा. आपल्यातील अनेकजण असे असतील जे दिवस-रात्र मेहनत करत असतील. परंतु त्यांच्या खिश्यात मात्र पैसे टिकत नाहीत. अशा लोकांनीही रविवारच्या दिवशी खाली दिलेले उपाय जरुर करून पाहावे.

हिंदू धर्मानुसार लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुम्हाला कधीही धन आणि सुख-समृदीची कमतरता भासत नसते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करणं आवश्यक आहे. खाली देण्यात आलेले उपाय अवश्य करावे.

लक्ष्मी प्राप्तीचे उपाय व तोडगे

१. गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अभिषेक केल्यास धनसंबंधीच्या कामात सहाय्य होते.

२.जुनी चांदीची नाणी आणि कवड्या दुधाने धुवून त्यांची पूजा करून एकत्र रेशमी वस्त्रात किंवा पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या तर लक्ष्मी प्राप्त प्रसन्न होते.

३.धनप्राप्तीसाठी काळी हळद हा महत्त्वपूर्ण तोडगा करू शकतो काळी हळद जवळ असले म्हणजे धनुष्य धनवान होतो. दर अष्टमीला या काळ्या हळदीची पूजा करावी आणि एका पुडीमध्ये बांधून ती पुडी जवळ ठेवावी. उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन ||ओम सूर्याय नं:|| हा जप करावा. धनप्राप्ती होईल.

४.वैभव वाढीकरता पाचू हे रत्न आपल्या घरातील पैशाचा कपाटामध्ये लटकवावे. तसेच गळ्यात घातले तरी याचा उत्तम गुण येतो.

५.एखाद्या शुक्रवारी कमळाचे फुल आणून ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा कपडे आहेत तिथे ठेवल्यास तिजोरीचा साठा वेगाने वाढू लागतो. कामधंदा प्रामाणिकपणे केल्यास यामध्ये भर पडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT