Surya Gochar 2024 in Kanya Rashi saam tv
राशिभविष्य

Surya Gochar : सूर्याचं गोचर वाढवणार टेन्शन; १ महिना 'या' राशींनी जरा सांभाळूनच राहावं

Surya Gochar 2024 in Kanya Rashi: १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.५० वाजता सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. या काळात जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींनी सावध राहिलं पाहिजे ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य ग्रह दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. उद्या म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे.

ज्योतिष्य पंचांगानुसार, १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.५० वाजता सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत सर्य ग्रह या राशीत राहणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींनी सावध राहिलं पाहिजे ते जाणून घेऊया.

मेष रास

मेष राशींच्या व्यक्तींना या काळात अधिक सावध राहावं लागणार आहे. तुमची काम अर्धवट राहण्याचा धोका आहे. कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं.

तूळ रास

सूर्य गोचर या राशींसाठी अनुकूल ठरणार नाही. या काळात तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुमच्याकडून या काळात अधिक प्रमाणात खर्च होणार आहे. तुमच्या शत्रूंपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मकर रास

सूर्य गोचरच्या काळात तुम्हाला अधिक प्रमाणात सतर्क राहावं लागणार आहे. ताणतणावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कुटुंबामध्ये जुने कलह पुन्हा डोकं वर काढू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Crime : भक्षकच! चिमुरडीचे शोषण केल्यानंतर अटक, २ वर्षांपूर्वी कोर्टातून पळाला अन् पुन्हा अत्याचार करुन लहान मुलीला संपवलं

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झाले मोठं नुकसान

Cyber Safety: ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी 'या' मसाल्याचं पाणी करेल तुमची मदत

ई-बाँडची घोषणा करताच विरोधकांचा हल्लाबोल; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT