Shani Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: कष्ट झेलण्यासाठी 'या' 3 राशींनी राहावं तयार; २९ मार्चपासून शनीच्या गोचरमुळे सुरु होणार वाईट काळ

Saturn transit March 2025: अडीच वर्षांनी शनी गोचर करणार आहे. २९ मार्च रोजी शनी त्याच्या राशीत बदल करणार आहेत. दरम्यान यानंतरची अडीच वर्ष काही राशींनासाठी धोकादायक असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

29 मार्च रोजी ज्योतिष्य शास्त्रानुसार, एक मोठा बदल घडमार आहे. या दिवशी न्यायाधीश शनी त्याची मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून देवगुरु बृहस्पतिच्या मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनी देव प्रत्येक अडीच वर्षांनी त्याच्या राशीत बदल करतो. त्यामुळे पुढची अडीच वर्ष शनी मीन राशीत राहणार आहेत. मीन राशीत शनीच्या येण्याने काही राशींवर ढैय्या आणि साडेसाती सुरु होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रामध्ये सर्वात मंद गतीने चालाणार ग्रह शनी आहे. २९ मार्च रोजी शनी रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीला १२ राशीचं चक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागते. शनी ज्यावेळी त्याच्या चालीमध्ये बदल करतो तेव्हा त्याच परिणाम सर्वल राशींच्या व्यक्तींवर होत असतो. मात्र यावेळी शनीच्या गोचरचा परिणाम काही राशींवर नकारात्मक होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना सावध रहावं लागणार आहे ते पाहूयात.

मेष रास

शनी गोचरमुळे मेष राशीच्या व्यक्तींना शनीच्या साडेसातीच्या पहिला टप्पा सुरु होणार आहे. हा टप्पा या राशीसाठी खूप कष्टकारी असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा घात करू शकतात. आजारी पडण्याची शक्यता असून गाडी चालवताना काळजी घ्यावी.

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तींनाही या काळात त्रास होणार आहे. तुम्हाला काही प्रमाणात शारीरिक समस्या जाणवू शकतात. घरामध्ये जुने वाद पुन्हा होण्याची शक्यता आहे. तुम्ही मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

या राशीच्या व्यक्तींवरही शनीच्या गोचरचा विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे. वेळ चांगली नसल्याने तुमची सर्व कामं बिघडणार आहेत. करियरमध्ये तुम्हाला मोठा ब्रेक लागणार आहे. या काळात तुमच्याकडून भरपूर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सांगलीत एका नवविवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

Box Office Collection : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' 300 कोटींच्या उंबरठ्यावर, तर वरुणच्या 'सनी संस्कारी' चित्रपटाच्या कमाईत सोमवारी घसरण

Viral Wedding Story : बिर्याणी अन् तळलेल्या माश्यामुळे लग्नात हाणामारी; नवऱ्याने मोडलं लग्न तर वधू पक्षाने बोलवलं पोलिसांना

Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT