Rashi Bhavishya Today 24 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आज 'या' राशीच्या लोकांना होईल यश प्राप्ती; प्रगतीच्या सापडतील नवीन वाटा, वाचा राशी भविष्य

Rashi Bhavishya Today 24 June 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच २४ जून रोजी ग्रहमानात मोठे बदल होणार असून काही लोकांना यशप्राप्ती होतील. काहींना प्रगतीच्या वाटा सापडतील. वाचा तुमचं राशी भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग २४ जून २०२४

वार सोमवार - तिथी - ज्येष्ठ कृष्ण तृतीया. नक्षत्र - उत्तराषाढा . योग - ऐंद्र. करण- वाणिज. रास - मकर. दिनविशेष - १२ पर्यंत चांगला.

मेष : नवीन वाटा सापडतील

भाग्य घेऊन आजचा दिवस आलेला आहे. अनेक नवीन वाटा आणि मार्ग सहजगत्या सापडतील. लांबचे प्रवास घडतील. देवधर्मावरचा विश्वास वाढीस लागेल.

वृषभ : मोठा धनलाभ होईल

आज ताकदीपेक्षा जास्त कामे वाढतील. शारीरिक कष्ट आणि ताण यांनी दिवस भरलेला असेल. अचानक मोठे धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन : कामे मनाप्रमाणे होतील

कामामध्ये भागीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. त्यातून अनेक नवीन कामाची आखणी आणि बांधणी करावी लागेल. व्यवसायासाठी काही प्रवासाचे नियोजन होऊ शकेल. कोर्टकचेरीची कामे मनाप्रमाणे होतील.

कर्क : अडचणी निर्माण होतील

आज थोड्या तब्येतीच्या तक्रारींचा दिवस वाटतो आहे. खराब पाणी किंवा तत्सम गोष्टीतून अडचणी निर्माण होतील. स्वतःची काळजी घ्या. शत्रूंना मात्र ताकास तूर लागू देऊ नका.

सिंह : सर्व इच्छा पूर्ण होतील

आपल्या नवीन गोष्टी करायचा सर्व इच्छा आज पूर्ण होतील. अपेक्षांना नवीन पंख फुटतील. कलाकुसर मनोरंजन सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होईल. संततीशी निगडीत चांगल्या वार्ता कानावर येतील.

कन्या : व्यवहार मनाप्रमाणे होतील

जागेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. वाहन खरेदी करणार असाल तर त्याचे बेत आखले जातील. एकूण दिवस मनाप्रमाणे घालवावा लागेल.

तूळ : पराक्रमाच्या गोष्टी घडतील

दंडामध्ये टाकत आहे तोपर्यंत अनेक गोष्टी पराक्रमाच्या घडत असतात. आज तोच दिवस आहे. केलेल्या गोष्टी या यशाची कमान घेऊन येणार आहेत.

वृश्चिक : लक्ष्मी प्राप्तीचे उत्तम योग

लक्ष्मी प्राप्तीचे उत्तम योग आज दिसत आहेत. त्यामुळे मन आनंदुन जाईल. केलेले कामाचे यश म्हणजेच पैसा असतो, कलियुगात असे म्हटले जाते. तो आज मिळेल.

धनु : मन सकारात्मक राहील

मन सकारात्मक राहील. आपल्यामुळे इतरांना सुद्धा आनंद होईल. व्यक्तिमत्व चांगले उठावदार असे राहील. नवीन काही गोष्टी करण्याची उमेद असेल.

मकर : खर्चावर नियंत्रण ठेवा

काळजीने कातर व्हाल. अर्थात या गोष्टी तात्पुरत्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणून विनाकारण काळजी करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ : छान सहकार्य लाभेल

आपले मित्रपरिवार नातेवाईक यांचे छान सहकार्य लाभेल. शेजारी सख्य राहील. जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने समेटल्या जातील.

मीन : यश प्राप्ती होईल

काम आणि कामाच्या ठिकाणी चांगले यश प्राप्ती होईल. आपले सहकारी आपल्याला कामात मदत करतील कामानिमित्त प्रवास घडण्याचे योग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT