Rashi Bhavishya Today 8th May 2024 Saam Tv
राशिभविष्य

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

Aajche Rashi Bhavishya: आपण आज कुणाच्या राशीत काय आहे, ते पाहू या. आज वार गुरूवार आहे.

Anjali Potdar

दैनिक पंचांग ९ मे २०२४

दिनांक -९ मे २०२४ वार- गुरुवार तिथी - शु. प्रतिपदा०६/२२ प . नंतर व्दितीया नक्षत्र- कृतिका योग- शोभन करण- बव०६/२२प . नंतर बालव . रास- वृषभ दिनविशेष - क्षयतिथी.

मेष - चटकदार पदार्थ खाण्या- पिण्याची इच्छा.

जिभेचे चोचले यासाठीचा आजचा दिवस दिसतो आहे. मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, चटकदार पदार्थ खाण्या- पिण्याची इच्छा होईल. त्यासाठी म्यानातून तलवार काढून उभे राहाल.

वृषभ- काहीतरी नवीन प्लॅन कराल.

आयुष्य रडायसाठी नाही तर मजेसाठी हे आपल्याकडे बघून समजते. आणि म्हणूनच आज काहीतरी नवीन प्लॅन कराल आणि तो पूर्णत्वास न्याल. मौजमजा, मस्ती याच्यासाठीच आजचा दिवस.

मिथुन - संदिग्धतेमध्ये राहाल.

अनामिक भीती आणि दडपड यांनी आजचा दिवस ग्रासला जाईल. काय करावे आणि काय करू नये ! अशा संदिग्धतेमध्ये राहाल. आणि म्हणूनच थोडंसं अध्यात्मिक पाया ठेवल्यास दिवस बरा आहे.

कर्क - मित्र मैत्रिणी, शेजार यांसोबत आजचा दिवस.

आगत स्वागत आदरातिथ्य या गोष्टी मुळातच आपल्याला आवडतात. त्यामुळे मित्र मैत्रिणी, शेजार यांसोबत मनस्वी दिवस आजचा राहील.

सिंह- कामे खूप आहेत.

'अब क्या करे क्या ना करे' असा दिवस म्हणजेच काय तर कामे खूप आहेत. तयारीसाठी वेळ कमी पण करावीच लागणार, अशामध्ये दिवसाच्या संधीचे सोने कराल.

कन्या -गुरु उपासना करा.

अहो भाग्य, भाग्य फळफळणे, भाग्याची मदत या सगळ्या गोष्टींचे अर्थ काय आहेत, हे आज समजून चुकेल. गुरु उपासना करा आणि पुढे चला.

तूळ - शारीरिक श्रम जास्त होतील.

असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी.. असं काहीही आज होणार नाही तर कष्ट मेहनत या गोष्टी कराव्याच लागतील. शारीरिक श्रम जास्त होतील.

वृश्चिक-दिवस मजेचा राहील.

शांतता ती किती असावी अबोला तो किती असावा ? हे तुमच्याकडे बघून कळते. पण भावनिकताही तेवढीच. म्हणून आज जोडीदाराबरोबर काहीतरी छान गोष्टी गुजगोष्टी करा. दिवस मजेचा राहील.

धनु -तब्येत जपा.

आपल्यापेक्षा वरचढ आपले नोकर चाकर होतील. म्हणून त्यांना थोडे कंट्रोल मध्ये ठेवा. विनाकारण त्रास कटकटी होणार नाहीत ना, याकडे लक्ष द्या. तब्येत जपा.

मकर -संतती सौख्य मिळेल.

शेअर्समध्ये पैसे गुंतवताना जपून खूप अधिक मुदतीच्या कोणत्याही गोष्टीत जास्त पैसा गुंतवू नका. संतती सौख्य मिळेल.

कुंभ - आई विषयी आज विशेष आस्था.

आई विषयी आज विशेष आस्था वाटेल. तिच्यासाठी काहीतरी करा , तिलाही बरं वाटेल. पण उगाचच आपण केलं म्हणजे आपल्याला श्रेय मिळेल ही कल्पना सोडून द्या.

मीन -नवीन काहीतरी ऊर्जा.

लेखनाची आवड असेल तर चला आज हातात कागद आणि पेन घेऊन कामाला लागू. नवीन काहीतरी ऊर्जा , उर्मी घेऊन आजचा दिवस आलेला आहे. त्याचे सोने करू. सहोदराशी सख्ख्य.

ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT