Rashi Bhavishya 21 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांना सापडतील नवे मार्ग; मनासारख्या घडतील घटना, वाचा आजचं राशी भविष्य

Rashi Bhavishya Today 22 June 2024 : मेष राशीचे व्यक्तींचा आज धार्मिक कार्यामध्ये सहभाग राहील. मीन राशीच्या लोकांचे कामानिमित्त प्रवास होतील, वाचा आजचे राशी भविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग - दिनांक २२ जून २०२४.

वार - शनिवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा/प्रतिपदा. नक्षत्र - मूळ. योग - शुक्ल. करण - बव. रास - धनु. दिनविशेष - क्षयतिथी.

मेष : प्रवास सुखदायी होतील

धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग राहील. मोठ्या प्रवासाची आखणी कराल. छोटे प्रवास सुखदायी होतील. एकूणच आजचा दिवस अध्यात्मासाठी वाहिलेला राहील.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील

कोणाच्याही सहकार्याचे अपेक्षा न करता नेटाने काम करा. कदाचित आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. त्याकडे विशेष लक्ष द्या.

मिथुन : नवीन मार्ग सापडतील

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवीन दिशा नवीन मार्ग सापडतील. जोडीदाराविषयी सकारात्मक भावना आज मनामध्ये येतील. दिवस चांगला आहे.

कर्क : परिस्थिती खचू देऊ नका

गुप्तशत्रूंवर मात कराल. अध्यात्मा कडे कल राहील. मनस्थिती खचली तरी परिस्थिती खचू देऊ नका, हे लक्षात ठेवा .

सिंह : मनोबल उत्तम राहील

आर्थिक क्षेत्रामध्ये मोठे धाडस करू शकाल. मनोबल उत्तम राहील. उपासनेकडे विशेष महत्त्व दिल्यास अधिक चांगल्या गोष्टी मार्गावर येतील.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी वाढतील

कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी पण कमी होतील. पोटाचे दुखणे याकडे विशेष लक्ष द्या.

तूळ : मनासारख्या घटना घडतील

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काही गोष्टी सहजगत्या मनासारख्या होत आहेत हे आज लक्षात येईल.

वृश्चिक : दिवसाचा आनंद लुटाल

जुनी येणी असतील तर वसूल होतील. व्यवसायमध्ये वाढ होईल. आवक जावक चांगली राहिल्यामुळे दिवसाचा आनंद लुटाल.

धनु : आनंदाची घटना कळेल

उत्साह उमेद आज वाढून आपला नवीन एक आयाम तयार होईल. दैनंदिन करणे मागे लागतील. एखादी आनंदाची घटना आपल्याला कळेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल

महत्त्वाची कामे रखडतील. उगाचच खर्चाचे प्रमाण वाढेल. मनस्थितीत त्रस्त होऊन जाईल .काळजी घ्या.

कुंभ : नवे लाभ पदरात पडतील

नातेवाईकांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील त्यातून नवे लाभ पदरात पडतील. दिवस छान जाईल.

मीन : महत्वाच्या बैठका होतील

राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका होतील आणि त्या यशस्वी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT