Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs: आजचा दिवस ठरणार ‘सुपर लकी’! जाणून घ्या कोणत्या ४ राशींना मिळणार जबरदस्त साथ

Zodiac signs blessings: आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहस्थितीमुळे चार राशींना विशेष समर्थन मिळणार असून त्यांच्यासाठी हा दिवस भाग्यवान ठरेल.

Surabhi Jayashree Jagdish

आज 30 नोव्हेंबरचा दिवस आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा महिना असून हेमंत ऋतूचा प्रभाव वाढताना दिसतोय. आज सकाळच्या वेळेत हलकी गारवा आणि प्रसन्न वातावरण जाणवतेय. यामुळे दिवस शांत, स्थिर आणि कामांमध्ये गती मिळवून देणारा आहे. नियोजन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

नवीन संधी, संवाद आणि प्रगतीसाठी आजचा दिवस योग्य असून कोणत्या राशींना आजच्या दिवशी चांगली संधी मिळणार आहे ते पाहूयात.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल दशमी

  • नक्षत्र: उत्तर भाद्रपद

  • करण: तैतिल

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: सिद्धि (01 डिसेंबर, 04:22:35 AM पर्यंत)

  • दिन: रविवार

  • सूर्योदय: 06:46:51 AM

  • सूर्यास्त: 05:24:51 PM

  • चंद्र उदय: 01:46:16 PM

  • चंद्रास्त: 01:27:52 AM

  • चंद्र राशी: मीन

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

राहुकाल: 04:05:06 PM ते 05:24:51 PM

यमघंट काल: 12:05:51 PM ते 01:25:36 PM

गुलिकाल: 02:45:21 PM ते 04:05:06 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:44:00 AM ते 12:26:00 PM

आजच्या दिवशी कोणत्या ४ राशींसाठी ठरणार लकी दिवस

मीन राशी

चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असल्याने आजचा दिवस अत्यंत सकारात्मक असणार आहे. विचारांना स्पष्टता, कामांमध्ये वेग आणि महत्त्वाचे निर्णय सहज पार पडू शकणार आहेत. आर्थिक बाबींसाठी अनुकूल वेळ असणार आहे.

कर्क राशी

घर, कुटुंब आणि भावनिक निर्णय घेण्यासाठी आजचा उत्तम दिवस आहे. कामांमध्ये अपेक्षित प्रगती, वरिष्ठांचे सहकार्य आणि लहान प्रवासातून फायदा मिळू शकणार आहे. संधी साधण्यासाठी चांगला दिवस आहे.

धनु राशी

व्यावसायिक क्षेत्रात लाभ, नवी संधी आणि मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रयत्नांना यश मिळेल आणि नाती अधिक मजबूत होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली आर्थिक स्थितीही सुधारणार आहे.

वृषभ राशी

कामातील भार हलका वाटेल आणि अडकलेली कामं पूर्ण होणार आहे. आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांती लाभण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT