Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Today's lucky zodiac signs: आजचा दिवस ठरणार खास; 'या' ४ राशींवर धनसंपत्ती आणि यशाचा वर्षाव

Daily horoscope for today: आजच्या ग्रहमानानुसार, काही राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. त्यांना धन आणि यशाची प्राप्ती होईल. चला, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार भाग्यवान राशी ज्यांना आजचा दिवस विशेष फलदायी ठरेल.

Surabhi Jayashree Jagdish

  • 24 सप्टेंबर 2025 हा आश्विन शुक्ल तृतीया दिवस आहे.

  • चंद्र तूळ राशीत असून चित्रा नक्षत्र आहे.

  • रवियोग, धनयोग आणि मंगलयोग जसे शुभ योग आहेत.

आज २४ सप्टेंबर २०२५ बुधवार हा आश्विन शुक्ल पक्षातील तृतीया तिथीचा दिवस आहे. या दिवशी चंद्र तूळ राशीत आहे आणि चित्रा नक्षत्र संध्याकाळपर्यंत राहणार आहे. सकाळपासून रवियोग आणि इतर शुभ योग तयार होत असल्यामुळे धार्मिक कार्य, खरेदी-विक्री, नवीन कामाची सुरुवात यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो. मात्र दुपारी १२.१८ ते १.४८ या राहुकालामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं तुम्ही टाळलं पाहिजे.

आजचं पंचांग

  • तारीख: २४ सप्टेंबर २०२५, बुधवार

  • तिथी: आश्विन शुक्ल तृतीया

  • वार: बुधवार

  • नक्षत्र: चित्रा (संध्याकाळी ४.१६ पर्यंत)

  • योग: रवियोग, विध्दयोग

  • सूर्योदय: सकाळी अंदाजे ६.१०

  • सूर्यास्त: संध्याकाळी अंदाजे ६.१५

  • चंद्रस्थिती: चंद्र तूळ राशीत

  • राहुकाल: दुपारी १२.१८ ते १.४८ (या वेळेत शुभ कार्य टाळावं)

शुभ मुहूर्त

  • लाभ मुहूर्त: सकाळी ६.२० ते ७.४९

  • अमृत मुहूर्त: सकाळी ७.४९ ते ९.१९

  • शुभ मुहूर्त: सकाळी १०.४९ ते दुपारी १२.१८

  • लाभ मुहूर्त (सायं): दुपारी ४.४७ ते संध्याकाळी ६.१७

या कालखंडात धार्मिक कार्य, नवीन कामाची सुरुवात, खरेदी किंवा व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता जास्त मानली जाते.

विशेष योग

आजच्या दिवशी काही खास शुभ योग तयार होत आहेत. यामध्ये धनयोग, मंगलयोग, ऐंद्रयोग आणि रवियोग यांचा समावेश आहे. या शुभ योगांमुळे धार्मिक कार्य, पूजा, शुभारंभ, खरेदी-विक्री या गोष्टी तुम्ही करू शकता. या योगांमध्ये केलेली कामं फायदा देतात, असं मानलं जातं.

आज कोणत्या राशींसाठी दिवस चांगला आहे

मेष

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. जर तुमची कोणती कामं अडकली असतील तर ती आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतात. नवी लोकांशी तुमची ओळख होणार आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे.

तूळ

चंद्र तूळ राशीत असल्याने या राशींच्या व्यक्तींना आजच्या दिवशी चांगला लाभ मिळणार आहे. तुमची आजच्या दिवशी आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कोणत्याही वादात सापडणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवणार आहात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आजच्या प्रत्येक कामात चांगलं यश मिळू शकणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. अचानक लाभ किंवा नवीन संधी मिळू शकणार आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष शुभ आहे. आजच्या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहेत. मानसिक समाधान मिळणार असून कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवाल.

24 सप्टेंबर 2025 रोजी कोणती तिथी आहे?

आश्विन शुक्ल तृतीया तिथी आहे.

आजच्या दिवशी चंद्र कोणत्या राशीत आहे?

चंद्र तूळ राशीत आहे.

राहुकाल कोणत्या वेळेस आहे?

दुपारी 12.18 ते 1.48 पर्यंत राहुकाल आहे.

आज कोणते शुभ योग आहेत?

रवियोग, धनयोग, मंगलयोग आणि ऐंद्रयोग आहेत.

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ आहे?

मेष, तूळ, वृश्चिक आणि मीन राशींसाठी शुभ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT