Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Auspicious Day Zodiac Signs: चंद्रदेवाच्या आशिर्वादाने आजचा दिवस ठरणार खास; या राशींना मिळणार शुभ परिणाम

Moon Transit Effects Today: ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र हा मनाचा आणि मातेचा कारक ग्रह मानला जातो. चंद्राची शुभ स्थिती मनःशांती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद घेऊन येते. आज चंद्र एका अत्यंत शुभ आणि बलवान स्थितीत असल्यामुळे, काही विशिष्ट राशींना त्याचे उत्तम आशीर्वाद मिळणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. सोमवारचा हा दिवस चंद्रदेवाशी संबंधित असल्याने मन:शांती, भावनिक संतुलन आणि मानसिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. आजच्या दिवशी ग्रहस्थिती आरोग्य, कार्यक्षमता आणि कौटुंबिक सौख्याला अनुकूल आहे. धार्मिक कार्य, यात्रा आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथी: शुक्ल षष्ठी

  • नक्षत्र: मूल

  • करण: कौलव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: सुकर्मा (सकाळी 07:51:20 पर्यंत)

  • दिन: सोमवार

  • ऋतु: शरद

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:23:01 AM

  • सूर्यास्त: 05:38:58 PM

  • चंद्रोदय: 11:24:50 AM

  • चंद्रास्त: 09:44:58 PM

  • चंद्र राशी: धनू

हिंदू मास आणि संवत्सर

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • अमान्त मास: कार्तिक

  • पूर्णिमांत मास: कार्तिक

अशुभ मुहूर्त

राहु काल: 07:47:30 AM ते 09:12:00 AM

यंमघंट काल: 10:36:29 AM ते 12:00:59 PM

गुलिकाल: 01:25:29 PM ते 02:49:58 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:38:00 AM ते 12:22:00 PM

या राशींना आजच्या दिवशी मिळणार लाभ

सिंह राशी

आज सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे संकेत मिळणार आहेत. ऑफिसच्या ठिकाणी तुमचं काम चांगलं राहणार असून वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंददायी वातावरण राहणार आहे.

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष फलदायी ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्या दूर होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर शुभवार्ता मिळू शकते.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस प्रगती आणि यशाचा आहे. कामात स्थैर्य येणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कौटुंबिक सहकार्य लाभणार आहे.

मीन राशी

मीन राशीच्या व्यक्तींना आज मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी किंवा शिक्षणाशी संबंधित कामांसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. मनोकामना पूर्ण होण्याचे योग आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloe Vera For Skin Benefits: हिवाळ्यात चेहऱ्याला लावा कोरफड, त्वचा दिसेल एकदम फ्रेश

Pati Patni Aur Panga: 'या' कपलने जिंकली ‘पती पत्नी और पंगा’ची ट्रॉफी; दुसऱ्या क्रमांकावर कोण? घ्या जाणून…

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली- वनमंत्री गणेश नाईक

Peanut Recipe: मुलं डब्यातल्या भाज्या खाऊन कंटाळलेत? मग शेंगदाण्याच्या या २ भन्नाट रेसिपी ट्राय करा

Pan Card: हे काम लगेच करा, अन्यथा बंद होणार पॅन कार्ड; सरकारने दिली डेडलाइन

SCROLL FOR NEXT