Guru Gochar saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: तूळ राशीसह ३ राशी आतापासूनच साजरी करणार दिवाळी; अतिचारी गुरु देणार पैसा; घरी येणार लक्ष्मी

Guru Transit 2025: ग्रहांच्या स्थितीतील प्रत्येक बदलाचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. धन, सुख, सौभाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जाणारा गुरु ग्रह लवकरच एका विशिष्ट अवस्थेत जात आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

साल २०२५ मध्ये गुरु ग्रहाने एका नव्या प्रकारचा प्रभाव निर्माण केला आहे. १४ मे रोजी गुरुने मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर तो ‘अतिचारी’ झाला आहे. म्हणजेच आता तो नेहमीपेक्षा जास्त वेगाने गोचर करत आहेत. विशेष म्हणजे हे अतिचारी गुरु आता पुन्हा एकदा गोचर करत आहेत. यंदा ते त्यांच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहेत.

हे गोचर १८ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून, त्याच दिवशी धनत्रयोदशी आहे. गुरुचं कर्क राशीत गोचर हे सर्व १२ राशींवर परिणाम करणार आहे. पण त्याचा सर्वाधिक शुभ परिणाम ३ विशिष्ट राशींवर होणार आहे. यावेळी ३ राशींना यंदाच्या दिवाळीपूर्वीच मोठा लाभ मिळू शकणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी अतिचारी गुरुचा कर्क राशीत प्रवेश अत्यंत फलदायी ठरणार आहे. हे लोक आर्थिक दृष्टिकोनातून मोठी भरभराट अनुभवणार आहेत. व्यवसाय किंवा नोकरीत मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. काही लोकांचं भाग्य इतकं उंचावणार आहे की त्यांचे जुने अपूर्ण स्वप्नही पूर्ण होतील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ जबरदस्त फलदायी ठरणार आहे. अतिचारी गुरुचे उच्च राशीत गोचर झाल्यामुळे त्यांच्या नशिबाला एक नवी दिशा मिळणार आहे. अनेक अडथळे दूर होणार आहे आणि अडकलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी अतिचारी गुरु कर्क राशीत येणं म्हणजे एक शुभ संदेश घेऊन येणं आहे. काहीही न ठरवताच अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी आर्थिक लाभ, नवी संधी, प्रमोशन, किंवा एखादा गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळणं समाविष्ट असू शकतो. काही लोकांना तर ह्या काळात त्यांचं आयुष्यच एका नव्या वळणावर जाईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT