Budh uday 2024 saam tv
राशिभविष्य

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Budh Uday 2024: ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह म्हणजे बुध ग्रह. बुध हा वाणी, संचार, माध्यम, व्यवसाय यांचा स्वामी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह म्हणजे बुध ग्रह. ज्यावेळी बुध ग्रह आपली राशीचक्र किंवा नक्षत्र बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी संयोग बनतो तेव्हा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होतात.

बुध ग्रहाचा होणार उदय

बुध हा वाणी, संचार, माध्यम, व्यवसाय यांचा स्वामी आहे. वैदिक ज्योतिषाच्या गणिती गणनेनुसार, ते शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:16 वाजता अस्त होतोय तर 13 दिवसांनी गुरुवार, 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6:02 वाजता उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होणारे ते पाहूयात.

मिथुन रास

बुधाच्या उदयाने मिथुन राशीचे लोक निर्णायक बनतील. अचानक आर्थिक लाभामुळे राहणीमान चांगलं होणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळू शकणार आहे. तुमचा दर्जा वाढेल आणि तुमचा आदर वाढणार आहे. जोडीदारासोबतच नातं अधिक खुलणार आहे.

कन्या रास

बुधाच्या उदयाने कन्या राशीचे लोकांना चांगल्या संधी मिळणार आहेत. या काळात गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक चांगला नफा मिळू शकतो. किरकोळ व्यवसायात लाभ होणार आहे. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. लव्ह लाईफमध्ये रोमांस वाढू शकतो.

तूळ रास

बुध ग्रहाच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांची लोकप्रियता वाढणार आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे. नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT