Surya Gochar Saam Tv
राशिभविष्य

Surya Gochar 2024: सूर्याचं नक्षत्र गोचर 'या' राशींच्या जीवनात आणणार वादळ; आर्थिक अपयशही येण्याची शक्यता

Surya Gochar 2024: नोव्हेंबर महिन्यात देखील सूर्य ग्रह नक्षत्र गोचर करणार आहे. सूर्याच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह गोचर करतो. याचाच अर्थ ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यानुसार ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. या महिन्यात देखील सूर्य ग्रह नक्षत्र गोचर करणार आहे.

19 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03:03 वाजता सूर्य देव अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी 27 नक्षत्रांपैकी अनुराधा नक्षत्र 17 व्या क्रमांकावर आहे, ज्याचा स्वामी शनिदेव आहे. सूर्याच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदल शुभ ठरणार नाही. आरोग्यासाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. छोट्या-छोट्या कामांसाठीही तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरदार लोक तणावात राहण्याचा धोका आहे. ज्या लोकांची स्वतःची दुकानं आहेत त्यांच्या नफ्यात घट दिसून येणार आहे.

मेष रास

मेष राशीचे लोक एकटे राहण्याचा विचार करतील. दुकानदारांनी गुंतवणूक करणं योग्य होणार नाही. कोणतीही गुंतवणूक किंवा व्यवसायात कोणताही बदल करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. नोकरदार लोकांना मालमत्तेशी संबंधित वादामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

तूळ रास

19 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला नसणार आहे. नोकरदार लोकांनी त्यांच्या करिअरची जास्त काळजी करू नये. या राशीच्या लोकांना कोणत्याही बाबतीत खरेदी-विक्रीचा निर्णय योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात नुकसान होऊ शकतं. तुम्ही अनेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी व्हाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT