Saturn Mercury and Venus saam tv
राशिभविष्य

Grah Gochar 2024: शनि, बुध आणि शुक्राचं गोचर या राशींचं टेन्शन वाढवणार; काहींचे पैसे अडकतील तर काहींची होईल धनहानी

Surabhi Jagdish

ऑक्टोबर महिना सुरु झाला असून या महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहे. ग्रहांच्या गोचरसाठी हा महिना फार खास मानला जातोय. या महिन्यात तीन ग्रहांची राशी आणि नक्षत्र बदलणार आहेत. पंचांगानुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी शनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून यामुळे ज्यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. बुध तूळ राशीत प्रवेश करणार असून भद्र राजयोग तयार होईल. अखेरीस शुक्र ग्रह देखील त्याच्या राशीत बदल करणार आहे.

13 ऑक्टोबर 2024 रोजी भगवान शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. या ग्रहांच्या राशी बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचा सल्ला आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी, बुध आणि शुक्राचं गोचर लाभदायक ठरू शकणार आहे. व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नोकरदार लोकांनाही उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

कन्या रास

या तिन्ही ग्रहांच्या राशीतील बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुमचे पैसे अडकू शकतात. गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. आजारामुळे होणाऱ्या वेदनांमुळे त्रास होऊ शकतो. कुटुंबामध्ये मोठा कलह होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी शनि, बुध आणि शुक्राचं गोचर अशुभ ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे दवाखान्यात जावं लागू शकतं. नातेवाईकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. कोर्ट कचेरीच्या भानगडीत सापडू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopa Hairstyle For Bride : लग्नात नऊवारी नेसणार आहात? मग ही खोपा हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

Hingoli News : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; बिहारकडे जाताना पोलिसांनी घेतले ताब्यात

Dabeli Recipe: फक्त वीस मिनीटांत तयार करा चमचमीत दाबेली

Maharashtra Politics : पवारांची खेळी, महायुती खिळखिळी! हर्षवर्धन पाटलांच्याही हाती 'तुतारी'; भाजपला सर्वात मोठा धक्का

Vajrasan Benefits: रोत्री झोपण्यापूर्वी वज्रासन करण्याचे फायदे...

SCROLL FOR NEXT