Grah Gochar  saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: डिसेंबरमध्ये ५ ग्रहांची चाल बदलणार; पुढच्या महिन्यापासून या राशींची भरणार तिजोरी, मोठं यश मिळणार

December 2025 Grah Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याला ग्रहांची स्थिती बदलत असते, पण डिसेंबर २०२५ हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या महिन्यात ५ प्रमुख ग्रहांच्या हालचालीत मोठे बदल होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

साल 2025 चा शेवटचा महिना डिसेंबर अनेक ग्रहांच्या गोचरमुळे खास ठरणार आहे. या महिन्यात गुरु, मंगळ, सूर्य ते शुक्रापर्यंत महत्त्वाचे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. 5 डिसेंबर रोजी देवगुरु बृहस्पति मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. 7 डिसेंबरला ग्रहांचा सेनापती मंगळ धनु राशीत गोचर करेल. बुध या महिन्यात दोनदा राशी बदलणार असून तो वृश्चिक आणि धनु राशीत राहणार आहे.

सूर्य सध्या वृश्चिक राशीत असून 16 डिसेंबरला तो धनु राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 20 डिसेंबरला वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करणार आहे. या बदलांमुळे काही राशींना करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि आरोग्याच्या बाबतीत विशेष लाभ मिळू शकणार आहे. या महिन्यात कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.

वृश्चिक रास

मंगळ स्वराशीत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऊर्जा आणि यश मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात या राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टी, जमीन किंवा गुंतवणुकीतून चांगला फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीपेशा लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. व्यवसायात विस्तार होईल आणि प्रतिष्ठा वाढेल.

धनु रास

या राशीच्या चौथ्या भावात शनी आहे. याशिवाय बुध, सूर्य, शुक्र आणि मंगळही या महिन्यात गोचर करणार आहेत. त्यामुळे धनु राशीच्या जातकांना सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे. बुधादित्य, शुक्रादित्य, मंगलादित्य, त्रिग्रही आणि पंचग्रही योग तयार होणार आहेत. परदेशात नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय आपल्या बाजूने होतील.

मीन रास

या राशीच्या लग्न भावात शनी आणि चौथ्या भावात गुरु विराजमान राहणार आहे. त्यामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये नवे पर्याय मिळणार आहे. पदोन्नती आणि वेतनवाढ होऊ शकते. गुप्तपणे तुमच्या हाती पैसा येऊ शकतो. आर्थिक वाढ होणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

Maharashtra Live News Update : शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT