Ardhakedra Yog saam tv
राशिभविष्य

Ardhakendra Yog 2025: 25 सप्टेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; धनदाता शुक्र बनवणार खास योग

Zodiac signs' luck will shine: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार मानवी जीवनावर शुभ-अशुभ प्रभाव पाडतो. धन आणि समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह (Venus) २५ सप्टेंबरपासून एका विशेष स्थितीत येत आहे, ज्यामुळे एक अत्यंत शुभ योग तयार होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पति ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. सध्या गुरु मिथुन राशीत विराजमान असून ते या वर्षभर या राशीतच राहणार आहेत. या काळात ते इतर ग्रहांशी युती करतील किंवा दृष्टि टाकतील, ज्यामुळे शुभ-अशुभ योग निर्माण होतात.

शारदीय नवरात्रीच्या काळात गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे आहे. या योगाचा तीन राशींवर विशेष लाभदायी परिणाम होणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, २५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून १६ मिनिटांनी गुरु आणि शुक्र ४५ अंशांवर येणार आहेत. या वेळी अर्धकेंद्र योग निर्माण होणार आहे. त्याच वेळी सिंह राशीत शुक्र केतूसोबत विराजमान असणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु-शुक्रांचा अर्धकेंद्र योग आयुष्याच्या अनेक क्षेत्रांत लाभदायक ठरणार आहे. कुटुंबासोबतचे क्षण सुखदायी होतील. मालमत्तेशी संबंधित व्यवहारांत लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुरुकृपेने सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या अडचणींना यशस्वीपणे तोडगा निघू शकणार आहे.

सिंह रास

या राशीसाठी गुरु-शुक्रांचा अर्धकेंद्र योग अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्र या काळात लग्नभावात असल्यामुळे शुभ परिणाम चांगले दिसून येतील. आत्मविश्वास आणि धैर्य वाढणार आहे. ज्यामुळे मोठे निर्णय घेणं किंवा जोखीम स्वीकारणं सहज शक्य होणार आहे. या आत्मबलामुळे तुम्ही स्पर्धा किंवा आव्हानांत यशस्वी ठराल.

धनु राशी

या राशीच्या लोकांसाठी गुरु-शुक्रांचा अर्धकेंद्र योग भाग्योदय करणारा आणि विशेष फायद्याचा ठरणार आहे. या काळात नशिबाची साथ मिळणार आहे. आत्मविश्वास व निर्णयक्षमता वाढेल, ज्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या सहज पार पाडता येतील. हे प्रवास आनंददायी अनुभवच नाहीत तर भविष्यकाळात प्रगती व नवे मार्ग खुलवणारे ठरतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोसोबत अंकिता वालावलकरनं शेअर केला फोटो, म्हणाली- "खरंच लग्न जमलंय"

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना आईचा सल्ला; “जरा शांत राहा”|VIDEO

Somvar Ke Upay: भगवान शंकरांना प्रिय आहेत 'या' 5 गोष्टी; सोमवारच्या दिवशी अडचणींपासून मुक्ततेसाठी करा हे उपाय

Ladki Bahin Yojana: ...तर या लाडक्या बहिणींचे १५०० बंद होणार, सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेना मंत्र्यांवर नाराज? बैठकीत खडेबोल सुनावले, राज्याच्या राजकारणात खळबळ!

SCROLL FOR NEXT