Budh Margi saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 5 दिवसांनी 'या' राशींचं नशीब पालटणार; बुध ग्रह मिळवून देणार पैसा

Budh Gochar 2025: काही ग्रह राशी बदलाप्रमाणे त्यांच्या नक्षत्रामध्येही बदल करतात. यामध्ये बुध ग्रहाचा देखील समावेश आहे. बुधाच्या नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणारे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा युवराज मानण्यात येतं. बुध ग्रहाला शास्त्रानुसार, शिक्षण, भाषण, व्यवसाय, एकाग्रता या घटकांचं कारक मानण्यात आलं आहे. हा ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी व्यतिरिक्त नक्षत्र बदलतात. जेव्हाही या ग्रहाच्या स्थितीत बदल होते तेव्हा या घटकांवर त्याचा परिणाम होतो.

५ दिवसांनी म्हणजेच ७ मे रोजी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी पापी ग्रह केतू अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रह अश्विनी नक्षत्रात प्रवेश करत असल्याने काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूयात.

सिंह रास

या राशीत बुध ग्रह आठव्या घरात आहे. पैज किंवा वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकणार आहे. पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेऊ शकता. तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो.

तूळ रास

अश्विनी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर, ते या राशीच्या सहाव्या घरात स्थित असेल. परदेशाशी संबंधित बाबींमध्ये फायदा होऊ शकणार आहे. यावेळी तुम्हाला खूप फायदा होऊ शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

मेष रास

बुध ग्रह अश्विनी नक्षत्रात प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुम्हाला अनेक नवीन संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातही फायदे मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT