rajyog saam tv
राशिभविष्य

Rajyog 2026: 500 वर्षांनंतर बनणार हंस-मालव्य राजयोग; 2026 मध्ये या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

ज्योतिषशास्त्रानुसार, हंसा-मालव्य राजयोग हा अत्यंत दुर्मिळ योग ५०० वर्षांनंतर पुन्हा निर्माण होणार आहे. २०२६ मध्ये हा योग तयार होईल आणि काही राशींसाठी हा काळ सुवर्णयुग ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात पंचमहापुरुष राजयोगांचं वर्णन आढळतं. हंस, मालव्य, शश, रूचक आणि भद्र अशी या राजयोगांची नावं आहेत. गुरु ग्रह उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करताच हंस राजयोग तयार होतो. तर शुक्र ग्रह आपल्या उच्च राशी मीनमध्ये प्रवेश करताच महापुरुष मालव्य राजयोग निर्माण होतो.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींसाठी शुभ काळाची सुरुवात होऊ शकणार आहे. यावेळी काही राशींना पद आणि प्रतिष्ठा मिळू शकणार आहेत. तर काही राशींना पैसा मिळू शकतो.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी मालव्य आणि हंस राजयोग लाभदायक ठरू शकतो. या काळात कामकाजात प्रगती होईल. वेळोवेळी आकस्मिक धनलाभाचे योग तयार होतील. कुटुंबात आनंद वाढेल आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या सर्जनशीलतेमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे तुम्हाला मोठा फायदा होईल.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीसाठी मालव्य आणि हंस राजयोग सकारात्मक ठरू शकतो. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठी व्यावसायिक डील मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. संतानाकडून शुभवार्ता मिळू शकणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवे जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे फायदा होणार आहे.

मिथुन राशि (Mithun Zodiac)

मिथुन राशीसाठी हंस आणि मालव्य राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात कामकाजात प्रगती होईल. नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळेल. हा काळ आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नवी योजना सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. नवे गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरतील. कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidayat Patel Murder Case: काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची मशिदीबाहेरच हत्या, आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसच्या २ नेत्यांवरही गुन्हा

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

Methi- Paneer Paratha Recipe: मुलांच्या टिफीनसाठी बनवा मेथी- पनीर पराठा बनवा, नाक न मुरडता डब्बा होईल फस्त

Heart Health: झोपेत अचानक श्वास घ्यायला त्रास होतोय? हृदयाला कमी ऑक्सिजन पोहोचण्याची असू शकतात 'ही' ६ लक्षणं

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडक्या बहिणींकडून वसूली, कर्मचार्‍यांनी लाटले प्रति महिना ₹१५००; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT