Todays Horoscope: आजच्या दिवशी 'या' राशींना पैसे मिळण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज विनायक चतुर्थी असून विशेष गणेश उपासना फलदायी ठरू शकते. कामाच्या ठिकाणी धावपळ आणि दगदग राहणार आहे.

वृषभ

कलाकारांना दिवस भरभरून काहीतरी पदरात दान मिळणार आहे. देवाने अनेक गोष्टीचे आपल्यासाठी नियोजन केले आहे.

मिथुन

खोट्या पैशाच्या नादाला लागून चुकीच्या गोष्टी करू नका. अचानक धनलाभ संभवतो आहे.

कर्क

जोडीदाराकडून सुखात वाढ होणार आहे. दोघांचे विशेष bonding आज राहणार आहे. कोर्टाचे निकाल सुद्धा मनाप्रमाणे लागतील.

सिंह

हृदयविकार, पाठीचे दुखणे, मानसिक ताण या समस्या जाणवतील. आपल्यासाठी सावधगिरीचा इशारा आहे.

कन्या

आज विशेष विष्णू उपासना फलदायी ठरणार आहे. आजपर्यंत केलेल्या गोष्टींचे चीज होताना आज दिसून येईल.

तूळ

घरी नवीन वस्तूंची खरेदी होईल. कुटुंबामध्ये वातावरण छान राहिल्यामुळे मनाला एक वेगळी उभारी येईल.

वृश्चिक

जवळच्या लोकं रूसण्याची शक्यता आहे. दिवस संमिश्र असणार आहे.

कुंभ

पैशाला अनेक वाटा आहेत त्यातूनच तुम्हाला पळवाटा काढाव्या लागतील. कोर्टाच्या कामांमध्ये काही यश मिळण्याची शक्यता आहे

मीन

सून - जावयांचा विशेष स्नेह लाभेल. दिवस सुखाचा जाणार आहे.