Mangal Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Nakshatra Gochar: आजपासून या राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु; नोकरी आणि व्यवसायात मिळणार प्रचंड यश

Mangal Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती दररोज बदलत असते आणि हे बदल मानवी जीवनात मोठे चढ-उतार घेऊन येतात. आज मंगळ ग्रह त्याच्या नक्षत्रात बदल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीत बदल करतात. यामध्ये मंगळ ग्रह देखील त्याच्या राशीबरोबरच नक्षत्र बदलतो. मंगळ साधारणपणे एका राशीत 45 दिवस राहतो. सध्या मंगळ आपल्या स्वराशी वृश्चिक राशीत विराजमान आहे. यामुळे रुचक राजयोग तयार झाला आहे.

मंगळाने आज 19 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश केला आहे. मंगळ हा बुध ग्रहाच्या नक्षत्रातमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता आहे ते पाहूयात.

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा ज्येष्ठ नक्षत्र प्रवेश अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. शुक्र लग्नभावात मालव्य राजयोग तयार करत असल्याने भाग्याचा पूर्ण साथ मिळणार आहे. जीवनात सुख-समृद्धी, धनसंपत्तीची प्राप्ती होणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. यावेळी तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या कुंडलीत मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करून लग्नभावात राहणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. मंगळाची दृष्टि सातव्या भावावर पडत असल्याने सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचं ज्येष्ठा नक्षत्र प्रवेश अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. व्यापार क्षेत्रातही लाभ होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या महिन्यात धावणार, बुलेट ट्रेनवरही रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

Vivah Muhurat 2026 Date: सनई चौघडे वाजणार! २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त, आताच तारखा बघून घ्या...

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

SCROLL FOR NEXT