Budh Gochar In Mithun saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: आजपासून चमकणार या राशींचं भाग्य; 10 वर्षांनंतर बुध करणार शुक्राच्या राशीत प्रवेश

Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार १० वर्षांनंतर बुध ग्रह शुक्र राशीत प्रवेश करत आहे. हा दुर्मिळ ग्रहयोग आजपासून सुरू होत असून काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी गोचर करतात. यावेळी नक्षत्रांमध्ये बदल होत असतात. याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. हा बदल काहींसाठी फायदेशीर तर काहींसाठी हानिकारक असू शकतो.

७ जानेवारी रोजी म्हणजे आज बुध पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या नक्षत्रात बुधाचा प्रवेश काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आह. या काळात अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही राशींना चांगले पैसे मिळणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो ते पाहूयात.

मिथुन राशी

बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि अनेक चांगल्या संधी मिळू शकणार आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या नक्षत्रातील बदल सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी मिळवण्याचं तुमचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.

मेष रास

बुध ग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी शुभ ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढणार आहे. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासमोर येणार आहेत. नवीन नोकरी आणि पगारात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुमचा सामाजिक दर्जाही वाढेल आणि नातेसंबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अवकाळीचा पुणे शहराला तडाखा, १४ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना

Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Weight Loss Recipe : चटपटीत 'इडली'ला बनवा हेल्दी, फक्त टाका 'हा' एक पदार्थ, झपाट्याने वजन होईल कमी

Explainer: लहान उद्योजकांसाठी खास टिप्स, हा नवा कसा गेम चेंजर ठरणार? वाचा सविस्तर

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT