Surya Nakshatra Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sun Jupiter nakshatra entry: १२ वर्षांनंतर एक अत्यंत शुभ योग जुळून येत आहे, जेव्हा 'सूर्य' ग्रह 'गुरु' (Jupiter) ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दुर्मिळ योगामुळे काही विशिष्ट राशींच्या लोकांचे नशीब आजपासूनच चमकेल

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह प्रत्येक वेळी एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. ग्रहांच्या या राशी आणि नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असतो.

आज म्हणजेच 6 जुलै रोजी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या काळात सूर्य मिथुन राशीत राहणार आहे आणि त्यांची गुरूशी युती होणार आहे. पुनर्वसु नक्षत्राचा स्वामीही गुरुच आहे. अशावेळी काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

धनु रास

सूर्य ग्रहाच्या नक्षत्रातील बदल आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची कामं चांगली होतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. व्यावसायिक भागीदारीत फायदा होणार आहे.

तूळ रास

तुळ राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहाच्या नक्षत्रातील बदल सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही भाग्यवान होणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे.

सिंह रास

आपल्यासाठी सूर्य ग्रहाच्या नक्षत्रातील बदल शुभ ठरू शकणार आहे. उत्पन्नाच्या नव्या स्त्रोतातून तुम्ही पैसे कमवू शकाल. या काळात महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. या काळात आपण आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून कला किंवा व्यवसायात यश मिळवू शकता. तुम्हाला शेअर बाजारातून नफा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT