Budh Ast 2024 saam tv
राशिभविष्य

Budh Ast 2024: बुध ग्रहाची अस्त स्थित पडणार महागात; 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे

Budh Ast 2024: नुकतंच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह अस्त झाला आहे. राजकुमार बुध सिंह राशीत अस्त झाला असून २३ सप्टेंबर रोजी तो कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचर प्रमाणे उदय आणि अस्त देखील होतात. नुकतंच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह अस्त झाला आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, १४ सप्टेंबर रोजी बुध ग्रह अस्त झाला आहे. राजकुमार बुध सिंह राशीत अस्त झाला असून २३ सप्टेंबर रोजी तो कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींवर याचा विपरीत परिणाम दिसून येणार आहे. या काळात कोणत्या राशींना सावध रहावं हे जाणून घेऊया.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं अस्त शुभ नसणार आहे. यावेळी आर्थिक बाजू कमकुवत होऊ शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात अचानक अशी काही घटना घडू शकते ज्यासाठी तुम्ही तयार नसणार आहात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्ही अडकू शकणार आहात . वादविवादांपासून दूर राहणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. तुम्हाला एकदम जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळू शकतो.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांवरही बुध ग्रहाच्या अस्त स्थितीचा वाईट परिणाम होणार आहे. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी आपल्याला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. भावनिक पातळीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना या काळात अधिक मेहनत घ्यावी लागेल.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाची स्थिती देखील अनुकूल राहणार नाही. पैशांच्या अधिक खर्चामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्याबाबत तुम्ही अधिक जागरूक राहिलं पाहिजे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

SCROLL FOR NEXT