mangal Shukra Yuti  Saam Tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: शुक्र-मंगळाच्या युती मिळणार पैसाच पैसा; 'या' राशींवर बरसणार धन संपत्ती

Zodiac Signs: शुक्र आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या भावात बसून समसप्तक योग तयार केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 अंश अंतरावर असताना हा योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे राजयोग तयार होतात. यामध्ये शुक्र ग्रह आणि ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ यांच्यामुळे खास राजयोग तयार झाला आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:13 वाजता एक विशेष योग तयार झाला आहे. हा ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानला जातो.

शुक्र-मंगळाने तयार केला खास योग

गुरुवारी 12 डिसेंबर 2024 पासून शुक्र आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या भावात बसून समसप्तक योग तयार केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 अंश अंतरावर असताना हा योग तयार होणार आहे. शुक्र-मंगळाच्या समसप्तक योगामुळे काही राशींचं नशीब चमकू शकणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र-मंगळ समसप्तक योग आर्थिक लाभाच्या नवीन संधी घेऊन येणार आहेत. नवीन योजनांवर काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. नवा प्रवास होऊ शकतो आणि अनुभवाची व्याप्ती वाढेल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून व्यवसायाचा विस्तार करू शकता.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना शुक्र-मंगळ समसप्तक योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. व्यवसायात वाढ होईल आणि नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. पैशाचा वेगवान प्रवाहामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून आराम मिळेल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळणार आहेत. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे. भागीदारीमध्ये लाभ होणार आहे आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवू शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT