Shukraditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Shukraditya Rajyog 2024: सूर्याने नुकतंच म्हणजेच 16 सप्टेंबरच्या संध्याकाळी कन्या राशीत प्रवेश केला आहे. यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक राजयोग देखील तयार होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा सूर्य हा नवग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो.

शास्त्रानुसार, सूर्याने नुकतंच म्हणजेच 16 सप्टेंबरच्या संध्याकाळी कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या राशीमध्ये सूर्याचा शुक्र ग्रहाशी संयोग झाला आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीने शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना या काळात सुखाचे दिवस जगता येणार आहेत. तर यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

शुक्रादित्य राजयोग लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. रखडलेली कामं तुमची पूर्ण होणार आहेत. समाजात मान-सन्मान मिळेल. बेरोजगारांना नोकरीचा लाभ मिळू शकेल.

वृश्चिक रास

कन्या राशीत सूर्य, शुक्राच्या गोचरमुळे शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती लाभदायक ठरणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर यश मिळू शकतं. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

सूर्य-शुक्र संयोग देखील रहिवाशांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात व्यवसायात लाभ होणार आहे. यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांनी इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. धनप्राप्ती करण्यात यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

20-25 हजारांमध्ये मुली मिळतात; भाजप मंत्र्यांच्या पतीने अकलेचे तारे तोडले, VIDEO

एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा भीमाशंकर मंदिरात राडा, पुजाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण|VIDEO

Sunday Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी कडकडीत मेगाब्लॉक! ट्रान्स हार्बरवर हालहाल होणार, कुठून कुठे अन् कसं असेल वेळापत्रक?

Maharashtra Live News Update: यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई,जन्म-मृत्यू नोंदीत छेडछाड करणार्‍यास बिहारमधून अटक

Gobi Paratha Recipe : 'असा' बनवा झणझणीत कोबीचा पराठा, लहान मुलं मिनिटांत टिफिन फस्त करतील

SCROLL FOR NEXT