Budhaditya And Shukraditya Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Budhaditya Yog : 12 महिन्यांनी सूर्य बनवणार शक्तीशाली राजयोग; 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Budhaditya Yog 2025: आज सूर्य ग्रहाने गोचर केलं असून ७ मे रोजी बुध ग्रह देखील रास बदलणार आहे. यावेळी या दोन ग्रहांची युती होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याची राशी बदलतो ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. १४ एप्रिल म्हणजेच आज रोजी सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी, ग्रहांचा राजकुमार बुध देखील ७ मे रोजी या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राज योग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १४ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजता मेष राशीत प्रवेश करेल आणि १४ मे पर्यंत या राशीत राहणार आहे. बुद्धीचा कारक बुध ७ मे रोजी या राशीत प्रवेश करणार असल्याने हा योग तयार होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग भाग्यवान ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या अकराव्या घरात सूर्य आणि बुध यांचा युती होणार आहे. या काळात तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल. कामाच्या ठिकाणीही तुमचा वेळ वाया जाणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग भाग्यवान ठरू शकणार आहे. दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड फायदे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये खूप फायदा होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे कल वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या स्पर्धकांना चांगली स्पर्धा देऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT