Surya Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Surya Nakshatra Gochar: 48 तासांत सुरु होणार या 3 राशींचा वाईट काळ; सूर्याच्या गोचरमुळे होणार कंगाल

Surya Nakshatra Gochar in Rohini 2025: येत्या २ दिवसांनी सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. सूर्याचं हे गोचर खूप खास मानलं जातं. मात्र यावेळी काही राशींना सतर्क राहावं लागेल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलाप्रमाणे नक्षत्र गोचर देखील केलं जातं. येत्या काळात सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचं रोहिणी नक्षत्र गोचर फार खास मानलं जातं. याचं कारण म्हणजे यावेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येतो.

२ दिवसांनी म्हणजेच २५ मे २०२५ रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी धोकादायक असणार आहे. यावेळी ३ राशींना कष्टायचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींनी सांभाळून राहण्याची गरज आहे.

मिथुन रास

सूर्याचं नक्षत्र गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतं. यामध्ये तुमचा अतोनात खर्च होऊ शकतो. तुम्ही पैसे गमावणार आहात. कोणत्याही ठिकाणची गुंतवणूक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कठीण काळाचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे.

तूळ रास

सूर्याचं रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश या राशींसाठी धोकादायक असणार आहे. या काळात तुम्हाला नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. आजार मागे लागण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो. दुःखाचा डोंगर या काळात तुमच्यावर कोसळू शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात सावधान राहिलं पाहिजे. तुम्ही मोठ्या कर्जामध्ये बुडण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्या समोर येतील. अनेक अशुभ प्रभाव तुमच्यावर पडू शकतात. कोणत्याही वादात सापडू नका.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विधानसभा आणि विधानपरिषद आमदार जाणार लंडन दौऱ्यावर

UPI New Rules: UPIचे नियम बदलले! गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार परिणाम

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू, तरी लोणावळ्यात ५ ते १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; कारण काय?

Solapur : सोलापुर हादरलं! प्रायव्हेट फोटो दाखवून ब्लॅकमेल, बलात्कार करून धर्मांतर केलं, अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १० तोळे ५०,२०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT