Budhaditya And Shukraditya Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: 12 महिन्यांनी सूर्य बनवणार डबल राजयोग; 'या' 3 राशींचा बँक बॅलन्स वाढणार, करियरमध्येही होणार प्रगती

Budhaditya And Shukraditya Rajyog 2025: दुसऱ्या ग्रहांशी युती झाल्याने राजयोगांची निर्मिती होते. अशातच सूर्याच्या गोचरमुळे येत्या काळात २ राजयोगांची निर्मिती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे आहे. यावेळी ग्रह जेव्हा त्यांच्या राशीत बदल करतात तेव्हा त्यांचा इतर ग्रहाशी संयोग होतो. दुसऱ्या ग्रहांशी युती झाल्याने राजयोगांची निर्मिती होते. अशातच सूर्याच्या गोचरमुळे येत्या काळात २ राजयोगांची निर्मिती होणार आहे.

सूर्य कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग करतो, ज्यामुळे अनेक शुभ योग निर्माण होतात. होळीच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी, सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी शुक्र आणि बुध आधीच उपस्थित असतील. अशा परिस्थितीत, या राशीत, सूर्य-बुध एकत्रितपणे बुधादित्य बनवणार आहे.

याशिवाय सूर्य-शुक्र यांच्या संयोगाने शुक्रादित्य राजयोग बनणार आहे. मार्च महिन्यात या डबल राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्याने सुखाचे क्षण येणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींना हा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

बुध-रवि आणि शुक्र-रवि यांची युती अकराव्या घरात होणार आहे. करिअरच्या क्षेत्रात मोठ्या प्रगतीसह प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. पण जर तुम्ही हुशारीने खर्च केलात तर ते चांगलं होणार आहे. वैवाहिक आणि प्रेम जीवन चांगले राहणार आहे. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे.

तूळ रास

मीन राशीत तयार होणारे शुक्रादित्य आणि बुधादित्य योग देखील या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असणार आहे. तुम्ही कामासाठी अधिक वेळ देणार आहात. पैशाच्या बाबतीतही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

मिथुन रास

या राशीत दहाव्या घरात बुधादित्य आणि शुक्रादित्य योग तयार होणार आहे. नोकरीत अनेक नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला प्रशंसा मिळू शकणार आहे. या काळात व्यापाऱ्यांनाही मोठा नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT