Sun Moon Mahapat Yog saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: सूर्य-चंद्र महापात योगामुळे 'या' राशींवर संकटांचे ढग; आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ, सगळे निर्णय चुकतील

Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या विविध योगांना महत्त्व आहे. त्यापैकीच एक म्हणजे सूर्य-चंद्र महापत योग, ज्याला व्यतिपत योग असंही म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने आपल्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र एका राशीमध्ये केवळ अडीच वर्ष राहतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या विविध योगांना महत्त्व आहे. त्यापैकीच एक म्हणजे सूर्य-चंद्र महापत योग, ज्याला व्यतिपत योग असंही म्हणतात.

हा योग विशेषतः अशुभ आणि अडथळा आणणारा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र एकाच नक्षत्रात असताना हा योग तयार होतो. हा योग काल म्हणजेच 17 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजून 44 मिनिटांनी तयार झाला. या योगाच्या दुष्परिणामांमुळे व्यक्तीच्या मनात नाहक चिंता, भीती आणि संभ्रमाची स्थिती निर्माण होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या योगाच्या दुष्परिणामांमुळे डोकेदुखी, मानसिक तणाव, थकवा आणि निद्रानाश यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या काळात तुमचं पैशांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढत्या आर्थिक संकटामुळे हा प्रकल्प विस्कळीत होणार आहे. कार्यक्षेत्रात अडथळे येणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिंह रास

या योगाच्या निर्मितीमुळे पोटाच्या समस्या, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.जास्त चिंता आणि अस्वस्थतेमुळे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वाद, सहकारी आणि वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती ढासळू शकते.

वृश्चिक रास

या काळात तुम्हाला हंगामी आजार आणि थकवा येऊ शकतो. कार्यक्षेत्रात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. अपूर्ण कामं प्रलंबित राहण्याची शक्यता दाट आहे. संभाषणात संयम ठेवण्याची गरज आहे. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT