Trigrahi Yog  saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: ५० वर्षांनंतर जवळ येणार सूर्य, बुध आणि गुरु; त्रिग्रही राजयोगामुळे 'या' राशींना मिळणार पैसा

Trigrahi Yog In Mithun: एका ठराविक काळानंतर ग्रहांचं गोचर होतं. यावेळी एका राशीत दोन किंवा तीन ग्रहांची युती होते. येत्या काळात असाच त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशी बदलतात. यावेळी ग्रह एकमेकांच्या जवळ येतात. तेव्हा खास योगाची निर्मिती होते. मे महिन्याच्या अखेरीस, गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर जूनमध्ये, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे मिथुन राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे.

या त्रिग्रही राजयोगामुळे काही राशींचं भविष्य उजळू शकणार आहे. काहींना अचानक पैसा मिळणार आहे तर काहींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या त्रिग्रही राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य, बुध आणि गुरूची युती सकारात्मक ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या लग्नस्थानी तयार होणार आहे. यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकणार आहे. विवाहित लोकांचं जीवन अद्भुत राहणार आहे. व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.

तूळ रास

सूर्य, बुध आणि गुरु ग्रहांचे जवळ येणं तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला उत्तम संधी मिळणार आहेत. तुम्ही कामासंदर्भात प्रवास करू शकता.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य, बुध आणि गुरू यांची युती संयोजन फायदेशीर ठरू शकणार आहे. या वेळी तुम्हाला प्रत्येक सुख मिळू शकणार आहे. संपत्तीत वाढ होण्याचे जोरदार संकेत आहेत. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो. सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

Bigg Boss 19-Pranit More : प्रणित मोरे 'बिग बॉस १९' का जिंकला नाही? 'ही' आहेत कारणे

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

जनावरांच्या गोठ्यात चिमुकलीवर बलात्कार; नंतर नराधमानं धार्मिक स्थळाजवळ आयुष्य संपवलं

Black Spots Onion: काळे डाग अन् बुरशी लागलेला कांदा खावा का? आरोग्यासाठी किती घातक? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT