Astrology suggests certain zodiac signs should avoid wearing silver to prevent negative effects. saam tv
राशिभविष्य

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Silver Wearing Rules: चांदी हा चंद्राशी संबंधित एक थंड धातू आहे, जो अग्नी राशीच्या लोकांसाठी अशुभ मानला जातो. यामुळे जीवनात चढ-उतार वाढू शकतात. कोणत्या राशींसाठी चांदी सर्वात जास्त हानिकारक ठरू शकते? हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • चांदी हा चंद्राशी संबंधित धातू आहे

  • अग्नी राशींसाठी चांदी घालणे अशुभ मानले जाते

  • आर्थिक अडचणी आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चांदी चंद्र आणि जल तत्त्वाशी संबंधित आहे. हा धातू मनःशांती आणि भावनिक संतुलनाशी जोडला जातो. परंतु तो प्रत्येक राशीसाठी सारखाच शुभ मानला जात नाही. ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, अग्नी तत्त्व असलेल्या राशींवर याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. अंगावर चांदी घातल्याने आयुष्यात चढ-उतार वाढू शकतात. एखादी व्यक्तीची श्रीमंती जाऊन गरिबी येऊ शकते. या कोणत्या राशी आहेत आणि त्यांनी चांदी धारण केल्याने काय दुष्परिणाम होतात? हे जाणून घेऊ.

मेष

मेष राशीसाठी चांदी परिधान करणे फायदेशीर मानले जात नाही. त्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि ही एक अग्नी तत्त्वाची रास आहे. चांदीची शीत ऊर्जा त्यांच्या स्वभावात असंतुलन निर्माण करू शकते. यामुळे मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी चांदी देखील अशुभ मानली जाते. त्यांचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि ही राशी अग्नी तत्वाशी देखील संबंधित आहे. चांदी परिधान केल्याने आत्मविश्वासाची कमतरता आणि आर्थिक चढ-उतार होऊ शकतात. याचा परिणाम निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही होऊ शकतो.

धनु

मेष, सिंह राशींप्रमाणे धनु राशींसाठी चांदी घातक आहे. धनु राशीच्या लोकांना चांदी अंगावर घालून नये असा सल्ला दिला जातो. त्यांचा स्वामी ग्रह गुरु आहे, जो अग्नी तत्वाशी संबंधित आहे. गळ्यात चांदी घालणे विशेषतः अशुभ मानले जाते. यामुळे कामात अडथळे आणि अस्थिरता येऊ शकते.

हे दुष्परिणाम आहेत

ज्योतिषशास्त्रानुसार,या राशींच्या जातकांनी चांदी धारण केली तर त्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते. कठोर परिश्रम करूनही संपत्तीचा संचय कमी होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव आणि अनावश्यक संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये, मानसिक चिंता देखील वाढू शकते.

या लोकांसाठी चांदी फायदेशीर आहे

कर्क, वृश्चिक आणि मीन राशींसाठी चांदी एक शुभ धातू मानली जाते. या जल राशी असून त्यांच्यावर चंद्राचा सकारात्मक प्रभाव असतो. चांदी त्यांचे मन शांत करते आणि भावनिक स्थिरता देत असते. तसेच, कामात यश मिळवण्यासाठी आणि मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठीही ती उपयुक्त मानली जाते.

टीप :येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रीय समजुतींवर आधारित असून ती केवळ माहितीच्या उद्देशाने दिले आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT