शुक्र ८ मे रोजी मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार
तीन राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार
आर्थिक स्थितीत सुधारणा आणि करिअरमध्ये प्रगती
संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह शुक्र, मृगशिरा नक्षत्रात भ्रमण करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. यामुळे शुक्र मंगळावर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल आणि त्याच्या प्रभावामुळे काही राशी समृद्ध होऊ शकतात. शुक्र ग्रहाचे गोचर ८ मे रोजी होणार आहे. ज्योतिषी सांगतात की, जसा शुक्र मंगळाच्या राशीत प्रवेश करेल तसे तीन राशींना लाभ मिळण्यास सुरुवात होईल. त्यांना अच्छे दिनाची प्रचिती होईल. मग या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ.
या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. अनेक सुवर्णसंधी चालून येतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. अडकलेला निधी परत मिळेल. इतरत्र दिलेले कर्ज परत मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन सौदे आणि फायदेशीर संधी मिळू शकतात. या काळात लोक तुमच्या शब्दांवर अधिक विश्वास ठेवण्याची शक्यता आहे.
आयुष्यात स्थिरता आणि प्रगतीचे संकेत मिळतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल आणि पैशांची बचत वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा नफा होण्याची दाट शक्यता आहे. या राशीतील काही जातकांना त्यांची वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. घरात सुख-शांती असेन. प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल.
या राशीमधील जातकांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. नातेसंबंध सुधारतील आणि जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल. या राशींचे लोक त्यांच्या कल्पकतेने लोकांना आश्चर्यचकित करू शकता. हा नक्षत्र बदल तुमच्या नातेसंबंधांसाठीही शुभ ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.