shash mahapurush rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Panch Rajyog: ३० वर्षांनंतर बनणार शश पंच राजयोग; 'या' राशींच्या घरी बरसणार पैशांचा पाऊस

Shash Panch Rajyog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, न्यायाची देवता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. यावेळी शनी मूळ त्रिकोण स्थानात आहे. शनीच्या या स्थितीतमुळे शश पंच राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शश पंच महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे काही लोकांना याचा पुरेपूर लाभ मिळू शकणार आहे. या राशीत शनिदेव मार्च २०२५ पर्यंत राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार. ज्यावेळी शनि तूळ, मकर किंवा कुंभ राशीमध्ये किंवा चंद्रापासून पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात असतो तेव्हा हा शश पंच महापुरुष योग तयार होतो.

हा राजयोग ज्या राशींच्या कुंडलीमध्ये असतो, त्यांना सगळ्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. याशिवाय त्यांच्या जीवनात यशाचे मार्ग खुले होणार आहेत. चला जाणून घेऊया या राजयोगाचा फायदा कोणत्या राशींच्या व्यक्तींना होणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या दहाव्या भावात शनी स्थित आहे. जो व्यक्तीला विशेष लाभदायक ठरणार आहे. या राजयोगात व्यक्तीला नवीन घर, वाहन किंवा मोठी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना फायदा मिळू शकतो.

तूळ रास

या राजयोगामुळे तूळ राशीच्या व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळू शकणार आहे. जे लोक स्पर्धा परीक्षांना बसणार आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. बेरोजगारांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकणार आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. मकर राशीत साडे सतीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT