Ardhakendra Yog saam tv
राशिभविष्य

Ardhakendra Yog: मौनी अमावास्येला शनी बनवणार अर्धकेंद्र राजयोग; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन, धनलाभही होणार

Ardhakendra Yog 2025: यावर्षी मौनी आमावास्येला या दिवशी शनि बुधासोबत शक्तिशाली राजयोग बनवणार आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये ग्रहांना आणि त्यांच्या स्थितीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मौनी अमावास्येला देखील जास्त महत्त्व असून माघ महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. या दिवसाचं खास महत्त्व म्हणजे मौनव्रत पाळण्यासोबतच स्नान आणि दान केलं जातं. अशातच यंदाची मौनी अमावस्या खूप खास मानली जातेय.

यावर्षी मौनी आमावास्येला या दिवशी शनि बुधासोबत शक्तिशाली राजयोग बनवणार आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, २९ जानेवारीला दुपारी ३:५८ वाजता शनी आणि बुध एकमेकांच्या ४५ अंशांवर असणार आहेत. ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे.

सद्या शनि कुंभ राशीत बसला आहे, तर बुध मकर राशीत आहे. अशा स्थितीत दोघांच्या स्थितीमुळे निर्माण झालेला अर्धकेंद्र योग अनेक राशींचे भाग्य उजळवू शकतो. शनि आणि बुध यांच्या अर्धकेंद्रामुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाचं अर्धकेंद्र खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीमध्ये शनि अकराव्या घरात आणि बुध दहाव्या घरात स्थित आहे. या राशीचा व्यावसायिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो. तुमच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठीही अर्ध केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. बुध शनीच्या राशीत असल्यामुळे या राशीच्या सातव्या घरात राहणार आहे. या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकणार आहे. भागीदारीत केल्या जाणाऱ्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफाही मिळू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना सुख-सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकणार आहे. तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नशिबाच्या घराचा स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

SCROLL FOR NEXT