Shani Revati Nakshatra transit 2026 effects on zodiac signs saam tv
राशिभविष्य

चार राशींवर शनिदेवाची कृपादृष्टी! आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; वाढणार धन, दौलत

Shani Nakshatra Parivartan : २० ऑगस्ट रोजी शनिदेव 'रेवती नक्षत्रा'त प्रवेश करतील. शनीचे या नवीन नक्षत्रातील संक्रमण प्रत्येक राशीवर वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • शनिदेव रेवती नक्षत्रात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

  • रेवती नक्षत्राचा स्वामी बुध असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

  • ज्योतिषीय मान्यतेनुसार चार राशींना या संक्रमणाचा शुभ परिणाम मिळण्याची शक्यता

शनी ग्रहानं २० ऑगस्ट रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश केलाय. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे आणि शनिचे या नक्षत्रातील आगमन चार राशींसाठी शुभ मानले जाते. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, रेवती नक्षत्रात प्रवेश केल्यावर शनि या चार राशींवर आपली शुभ दृष्टी टाकेल.

या राशींच्या व्यक्तींसाठी नोकरी, व्यवसाय, उत्पन्न आणि आर्थिक स्थितीशी संबंधित बाबींमध्ये चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि रोजगार व व्यवसायाशी संबंधित परिस्थिती सुधारेल. तसेच, रखडलेल्या कामांनाही गती मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ

शनीच्या नक्षत्रातील हा बदल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळू शकते आणि पगारात वाढ होण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर समाधानी राहू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासोबतच, तुम्हाला तुमच्या पसंतीची नोकरी मिळण्याचेही संकेत आहेत.

मिथुन

या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे रेवती नक्षत्रातील संक्रमण अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. त्यातून आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या काळात केलेल्या प्रवासातूनही लाभ होण्याची अपेक्षा आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता गती घेऊ शकतात.

तूळ

नक्षत्रातील या बदलामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना दिलासा मिळू शकतो. कामातील अडथळे कमी होऊ शकतात आणि तुम्हाला कार्यस्थळी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता.

मकर

वृषभ, तूळ, मिथुन प्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या कष्टाच्या प्रमाणात फळ मिळण्याचे संकेत आहेत. परदेशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता असून तुमची आर्थिक स्थिती बळकट होण्याची अपेक्षा आहे. समाज आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा व मान-सन्मान वाढू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Process: गोड पदार्थ खायला फार आवडतात? पण, तुम्हाला माहिती आहे का त्यातील साखल कशी तयार होते?

Mehandi Tips मेहंदी रंगेना ! डार्क मेहंदी करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

भाजप नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात मोठी खळबळ

BP Medicines Precautions: ब्लड प्रेशरची रोज गोळ्या घेताय? मग, 'या' ७ गोष्टींची काळजी घ्या

Maharashtra News Live Update: चाकण MIDC च्या विकासासाठी '३-स्तरीय' (Short, Mid, Long term) कृती आराखडा

SCROLL FOR NEXT