Shani Gochar 2025 Saam Tv
राशिभविष्य

Shani Gochar: नव्या वर्षात 'या' तीन राशींवर शनीदेव होतील खूश, नव्या वर्षात करणार धन वर्षाव

Shani Gochar 2025: शनी ग्रह 2025 मध्ये कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे बारा राशींपैकी तीन राशींच नशीब बदलणार आहे.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषशास्त्र अनुसार कोणताही ग्रह कोणत्याही एका राशीमध्ये निश्चित वेळेसाठी राहतात. सर्व नऊ ग्रह वेळे-वेळेवर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. 2025 मध्ये सुमारे अडीच वर्षानंतर राशीत परिवर्तन करणारे शनिदेव आता पुन्हा राशी बदलणार आहेत. शनी ग्रह 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. या वर्षी शनीदेखील चांदीचा आधार धारण करतील. याचे शुभ परिणाम 3 राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनी कोणत्याही राशीत प्रवेश करतात तेव्हा शनी देव काय आशीर्वाद देणार हे निश्चित होतं. तसेच ते कोणता पाय निश्चित करणार आहेत तेही दिसत असतं. शनिदेवाचे चार पाया असतात यात सोने, चांदी, लोखंड आणि तांबे याचा समावेश होतो. २०२५ मध्ये कुंभ राशीतून बाहेर पडत शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच शनी ग्रहाद्वारे चांदीचा पाया देखील धारण केला जाणार आहे.

यामुळे बारा राशीतील तीन राशींच्या जीवनात मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. यावेळी दुसऱ्या चरणात चंद्रमा ५ व्या आणि ९ व्या घरात शनी असल्याने चांदीचा पाया धारण केला जाणार आहे.

वृश्चिक राशी

शनीने चांदीचे पाऊल धारण केले तर सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. नवीन कामात रुची वाढू शकते.

तूळ

कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. कर्जमुक्तीसाठी काळ चांगला राहील. सर्व कामात यश मिळेल. तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा योग येईल.

कुंभ

कुंभ राशीसाठी शनीची चांदीची पायरी धारण करणे उत्तम ठरणार आहे. सर्व कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. येणारा काळ देशवासीयांसाठी चांगला राहील. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. अचानक आर्थिक लाभ होईल आणि त्यासाठी नवीन दरवाजेही उघडतील. रात्रंदिवस परिश्रम करून सत्कर्म केल्यास लवकर फळ मिळते. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण चांगले राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT