Shani Uday saam tv
राशिभविष्य

Shani Dev Uday: 30 वर्षांनंतर शनीदेवाचा होणार उदय; 'या' राशींना लॉटरी लागून पदरात पडणार पुण्य

Shani Dev Uday In Meen: ज्योतिषशास्त्रात कर्मफलदाता आणि न्यायाची देवता मानले जाणारे शनिदेव, दीर्घकाळानंतर लवकरच उदय होणार आहेत. सुमारे ३० वर्षांनंतर शनिदेवाचा हा योग काही राशींसाठी अत्यंत शक्तिशाली आणि शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक शास्त्रांनुसार शनिदेव यांना कर्मफलदाता, न्यायाधीश आणि दंडाधिकारी मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या गतीत बदल झाला की, त्याचा थेट परिणाम पृथ्वीवरील घटनांवर दिसून येतो. वर्ष २०२६ मध्ये शनीदेवांचा उदय होणार आहे. ते गुरुच्या स्वामित्वाखालील मीन राशीत विराजमान होणार आहे.

गुरु बृहस्पतीच्या आधिपत्याखालील या राशीत शनीदेव उदय झाल्यामुळे सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, तीन राशी अशा आहेत ज्यांना या काळात धनलाभ, प्रगती आणि आकस्मिक लाभाचे योग तयार होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीदेवांचा उदय अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. ते कर्म आणि भाग्य स्थानाचे स्वामी असल्यामुळे या काळात भाग्याचा प्रबल साथ मिळणार आहे. कामकाजात यश मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील आणि अधिक धन मिळवता येणार आहे. दीर्घकाळापासून थांबलेली कामं पुन्हा सुरू होणार आहे.

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी शनीदेवांचा उदय सुखद ठरणार आहे. या काळात कार्यसिद्धी होणार आहे.भावंडांचा सहयोग मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. कामकाजाच्या क्षेत्रात मान-सन्मान वाढणार आहे. कुटुंब आणि समाजात ओळख आणि सन्मान वाढणार आहे.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीदेवांचा उदय लाभदायक ठरेल. या काळात कामकाजात नवीन संधी मिळणार आहे. कार्यस्थळावरून शुभवार्ता मिळू शकणार आहे. आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. जीवनसाथीचा सहयोग मिळेल त्याचप्रमाणे मित्रांकडूनही शुभवार्ता मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Paratha: दररोज आलू पराठा खाल्ल्यास काय होईल?

PM Modi : नेहरूंनी 'वंदे मातरम्'लाच विरोध केला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण, इंदिरा गांधींवर साधला निशाणा

Maharashtra Live News Update: विधानभवनावर आज चार मोर्चे धडकणार , यशवंत स्टेडियमपासून सर्व मोर्चे निघणार

Gautam Gambhir: कोचला टार्गेट करू नका, त्याची नोकरीही...! गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

SCROLL FOR NEXT