Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: सूर्याने कन्या राशीत जाताच बनवला षडाष्टक योग; 'या' राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार वादळ

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार, एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी एका वर्षात सुमारे अडीच वर्षे राहतो. ग्रहांचा राजा सूर्यावर शनीची दृष्टी पडत असल्याने षडाष्टक योग तयार होतोय. यावेळी सूर्य कन्या राशीत असून शनि मूळ त्रिकोण कुंभ राशीत असल्याने त्यांच्यावर दृष्टी आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी वाढू शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य कन्या राशीच्या चढत्या घरात तर शनी सहाव्या घरात आहे. अशा स्थितीत काही राशींच्या नशिबावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात काही राशींच्या हातून संधी निसटून जाऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींनी या काळात सतर्क राहावं.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग फायदेशीर ठरणार नाही. वडिलांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पैशाबाबत कोणताही निर्णय हुशारीने घ्या, जेणेकरून तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागणार नाही. प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येणार आहेत. तुम्हाला तणावाचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं.

कन्या रास

षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी काही अडचणी वाढवू शकतो. वडिलांना हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात. आरोग्याबाबतही थोडे सावध राहण्याची गरज आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ फारसा चांगला राहणार नाही. बिझनेसमध्ये तुमचे विरोधक तुमच्यासाठी काही अडचणी निर्माण करू शकतात. आर्थिक परिस्थितीवर काही नकारात्मक प्रभाव पडू शकतो. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सध्याचे सरकार बैल पुत्र, त्यांचा बाप बैल, त्यांची बुद्धीही बैलाची; संजय राऊतांची सरकारवर टीका

Marathi News Live Updates : वीज बिल आता कुणाला येणार नाही - धनंजय मुंडे

IAS Jayganesh: IAS होण्याची जिद्द! ६ वेळा UPSC मध्ये फेल, IB ची ऑफरही धुडकावली; पण आयएएसचं स्वप्न पूर्ण केलेच, यशोगाथा वाचाच

Viral Video: 'ओ टमाटर बडे मजेदार' नर्सरीच्या शिक्षकांचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल ; डान्सचं होतंय कौतुक

IND vs BAN 2nd Test : रोहित-गंभीरच्या डावपेचामुळे बांगलादेशचा खेळ खल्लास, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT