saturn to enter jupiter nakshatra saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: शनी करणार गुरुच्या नक्षत्रात गोचर; 'या' ३ राशींवर पाण्यासारखा बरसणार पैसा

Shani Gochar 2025 in purva bhadrapada Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे गोचर आणि त्यांचे नक्षत्र परिवर्तन मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच, कर्मदाता शनी ग्रह त्याच्या प्रिय कुंभ राशीत राहून, गुरु ग्रहाच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहे. पण ऑक्टोबर २०२५ मध्ये शनी गुरुच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा स्वामी म्हणजे देवगुरु बृहस्पती. गुरु हे ज्ञान, धर्म आणि अध्यात्म यांचे कारक मानले जातात, तर शनी हे कर्मफळ आणि न्यायाचे कारक आहेत. त्यामुळे गुरुच्या नक्षत्रात शनीचा गोचर काही राशींना मोठा फायदा करून देणारा ठरू शकतो.

शनी लवकरच गुरुच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या बदलामुळे काही राशींच्या आयुष्यात अडकलेली कामं वेगाने पूर्ण होऊ शकणार आहेत. यावेळी धनलाभाचे योग निर्माण होऊ शकतात. चला पाहूया कोणत्या ३ राशींवर या बदलाचा विशेष परिणाम होणार आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा हा बदल आनंद आणि सुखाची दारं उघडणारा ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाचे नवे स्रोत मिळू शकणार आहेत. नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकणार आहे. कामाची प्रशंसा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या डील्स मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं हे गोचर अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. परदेश प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. नोकरीत उत्तम संधी मिळणार आहेत. रोजगार शोधणाऱ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लोक त्यांच्या कामाच्या पद्धतीने आणि बोलण्याच्या कौशल्याने प्रभावित होणार आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं हा गोचर आत्मविश्वास आणि भाग्य दोन्ही वाढवणारा ठरणार आहे. मेहनतीचे गोड फळ मिळणार आहे. उच्च शिक्षणात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अरूण गवळीला सुप्रिम कोर्टातून जामीन मंजूर

Ganesh Chaturthi 2025: गौरी- गणपती यांच्यात नातं काय आहे?

Pune Crime : काम व्यवस्थित कर... सततच्या सूचनांना कंटाळला, वैतागलेल्या वेटरनं हॉटेल चालकाला संपवलं

Hansal Mehta: टोरंटोमध्ये 'गांधी' वेब सिरिजच्या प्रदर्शनापूर्वी हंसल मेहता यांना मोठा धक्का, सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हणाले...

समुद्राच्या खाली असं काय आहे ज्याचा सध्या NASA घेतेय शोध?

SCROLL FOR NEXT