Shani Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: 27 वर्षांनी शनी करणार गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shani Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर (Transit) आणि राशी परिवर्तन जीवनावर मोठे परिणाम करतात. कर्मदाता शनी (Saturn) आणि धन-भाग्याचा कारक गुरु (Jupiter) या दोन महत्त्वाच्या ग्रहांचा संबंध आणि बदल अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Surabhi Jayashree Jagdish

न्याय आणि कर्माचे अधिपती म्हणून ओळखले जाणारे शनि ग्रह ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्वाचे मानले जातात. शनि हा नवग्रहांमध्ये सर्वात हळू चालणारे ग्रह आहेत. ते एका राशीत साधारणपणे साडे दोन वर्षे राहतात. त्यामुळे संपूर्ण १२ राशींचं चक्र पूर्ण करण्यासाठी शनीला जवळपास ३० वर्षांचा कालावधी लागतो. याच कारणामुळे शनिचं गोचर व्यक्तीच्या आयुष्यावर खोलवर आणि दीर्घकालीन परिणाम घडवतो.

शनि फक्त राशींमधून प्रवास करत नाहीत तर ठराविक कालांतराने ते नक्षत्रही बदलतात. या नक्षत्र परिवर्तनाचाही परिणाम जीवनावर स्पष्टपणे जाणवतो. करिअर, व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध यांसारख्या आयुष्याच्या विविध क्षेत्रांवर या बदलांचा थेट प्रभाव पडतो.

या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला शनि गुरु बृहस्पतीच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हा बदल अनेक राशींसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. काही राशींसाठी ही वेळ प्रगती, नवी संधी आणि यश घेऊन येईल, तर काहींना या काळात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

कधी करणार शनी नक्षत्र गोचर?

ज्योतिषशास्त्रानुसार, ३ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. यावेळी २० जानेवारीपर्यंत या नक्षत्रात राहणार आहेत. त्यानंतर ते उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. आकाशातील २७ नक्षत्रांपैकी पूर्वाभाद्रपद हे २५वे नक्षत्र असून त्याचे अधिपती गुरु बृहस्पती आहेत. हे नक्षत्र मीन आणि कुंभ राशींशी संबंधित आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या जातकांसाठी शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. दीर्घकाळ अडकलेली कामं आता पूर्ण होणार आहेत. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. आत्मविश्वास झपाट्याने वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. प्रेमसंबंधात गोडवा वाढणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या जातकांसाठी शनीचा गुरुच्या नक्षत्रातील प्रवासही लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात अनेक प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. कोर्टाच्या संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकणार आहे. बराच काळ चालत असलेल्या अडचणी आता कमी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात प्रगतीची संधी मिळणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या जातकांसाठी शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात चौथ्या भावात राहणार आहेत. या स्थितीत शनि आणि गुरु या दोघांचीही विशेष कृपा मिळेल. सुख-सुविधा प्राप्त होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंददायी ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता असून पदोन्नती आणि वेतनवाढीचे योग आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

Gopinath Munde Legacy Controversy: धनंजयने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा,भुजबळांच्या वक्तव्यामुळे वादाचा भडका

SCROLL FOR NEXT