राशिभविष्य

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Saturn Retrograde on Diwali: यंदाची दिवाळी २०२५ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे, तब्बल ५०० वर्षांनंतर दिवाळीच्या दिवशी कर्मफलदाता शनिदेव आपली चाल बदलणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

यंदा दिवाळीचा सण २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. पौराणिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, कारण याच दिवशी भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतले होते. यावेळी दिवाळी अधिक खास बनवणारी एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनि वक्री असणार आहेत. असा संयोग जवळपास ५०० वर्षांनंतर निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हे कर्मफलदाता देवता मानले जातात. ते व्यक्तीच्या कृतीनुसार फल देतात. जेव्हा शनि वक्री होतात तेव्हा त्यांची गती मंदावते आणि त्याचा प्रभाव सर्व राशींवर जाणवतो.

हा प्रभाव काहींसाठी अत्यंत शुभ तर काहींसाठी सावध राहण्यास सांगणारा ठरू शकतो. शनि वक्री काळामध्ये अनेकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवणार आहेत. काहींना मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात तर काहींना विलंबानंतर यश प्राप्त होते.

मिथुन

मिथुन राशीसाठी शनि वक्री चाल अत्यंत लाभदायक ठरू शकते. करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन उंची मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. बराच काळ अडकलेली कामं आता पूर्ण होणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनचे योग आहेत. व्यवसायात भागीदारीतून फायदा होईल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शिक्षण आणि करिअरमध्ये हा काळ सुवर्णसंधी घेऊन येऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. परदेशात जाण्याच्या योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभ होऊ शकतो.

कुंभ रास

कुंभ ही शनीची स्वतःची रास असल्याने शनि वक्री असल्यावर या राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळतो. जीवनात जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्यासोबतच मोठे यश आणि प्रगतीचे मार्ग खुलतील. करिअरमध्ये अचानक मोठ्या संधी मिळू शकतात. योग्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

Delhi Bomb Blast: भारतातही हमासप्रमाणे हल्ल्याचा कट; उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक, NIAची मोठी कारवाई

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज–उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! युतीची पायाभरणी?

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

SCROLL FOR NEXT